IMPIMP

Pune PMC Amenity Space In Kharadi | महापालिकेच्या खराडी येथील ‘मलाईदार’ कोट्यवधीच्या भूखंडावर बड्या बांधकाम व्यावसायिकाची ‘ताबेदारी’?

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाचा 'वरदहस्त'?

by nagesh
Pune PMC Amenity Space In Kharadi | possession of a reserved plot worth seven hundred crores by a big builder is underway?

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Amenity Space In Kharadi | महापालिकेच्या मालकीचा खराडी येथील सुमारे सातशे कोटींचा आरक्षित भुखंड एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने परस्परच ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू केली आहे. तब्बल 15 हजार 799 चौ. मी. चा भूखंड बळकवला जात असताना प्रशासनाला खबर नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Pune PMC Amenity Space In Kharadi)

खराडी सर्व्हे न. 53 व 54 येथील 15 हजार 779 चौरस मीटरची अ‍ॅमेनिटी स्पेसची (Pune PMC Amenity Space In Kharadi) जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. या भुखंडावर एक्झिबेशन सेंटरचे आरक्षण आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या उभ्या राहिल्याने या भुखंडाची किमंत आता जवळपास सातशे कोटींच्या जवळपास आहे. त्यामुळे हा भुखंड घेण्यासाठी शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने प्रयत्न सुरू केले आहेत. या भुखंडाच्या बदल्यात संबधित व्यावसायिकाने पालिकेला अतिक्रमण असलेल्या भुखंड देण्याची तयारी दर्शवली आहे. (Pune PMC Reserved Land In Kharadi)

याकरिता मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला नगरविकास विभाग (Department of Urban Development Maharashtra) महापालिका प्रशासनावर (PMC Administration) दबाव आणत आहे. त्यामुळे पालिका देखील त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करत आहे. मात्र, त्यास विरोध झाल्यानंतर वर्षभरापासून प्रशासकीय कार्यवाही थांबली आहे. मात्र संबधित बांधकाम व्यावसायिकाने या भुखंडावर गेल्या आठवडाभरापासून परस्पर ताबा घेण्याचे काम सुरू केले आहे. या भुखंडावर लोखंडी पत्रे लावून एक केबिन तयार करण्यात आली आहे. तसेच महापालिकेची भिंत तोडून बांधकाम व्यावसायिकाने आरक्षित भुखंडाला स्वतंत्र भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. तसेच जेसीबी लावून या भुखंडावर काम सुरू आहे.

दिवसा उजेडी महापालिकेच्या मलईदार भूखंडावर कब्जा होत असताना पालिका प्रशासनाला अद्याप काडीमात्र कल्पना नाही. अ महापालिकेच्या संबधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असताना त्यांनी यासंदर्भात चौकशी करु असे मोघम उत्तर देण्यात आले.

खराडी रेसिडेन्शील वेलफेअरकडून विरोध

एक्झिबेशन सेंटरच्या भुखंड बांधकाम व्यावसायिकाने परस्पर ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू केल्यानंतर खराडी रेसिडेन्शील वेलफेअरकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. असोसिशनच्या अध्यक्षा प्रभा करपे यांच्यासह सदस्य प्रशांत मेहता आणि नितीन करोडे, योगिता अंबाडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम थांबविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनाही बोलविण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कामे सुरूच होते.

एक्झिबेशन सेंटरवर जे काम सुरू आहे. त्या ठेकेदाराने हे काम महापालिकेचे
असल्याचे आम्हाला खोटे सांगितले. वर्क ऑर्डर मागितल्यानंतर एका बांधकाम व्यावसायिकाचे
हे काम असल्याचे त्याने सांगितले. याबाबत महापालिकेने खुलासा करून कार्यवाही करावे अन्यथा तिव्र आंदोलन उभारू.

– प्रभा करपे, अध्यक्षा, खराडी वेलफेअर रेसिडेन्शील वेलफेअर
(Prabha Karpe, Chairperson, Kharadi Welfare Residential Welfare)

Web Title : Pune PMC Amenity Space In Kharadi | possession of a reserved plot worth seven
hundred crores by a big builder is underway?

Related Posts