IMPIMP

Pune PMC News | नवीन निवासी इमारतींसह व्यावसायीक व सेवा प्रदान करणार्‍या इमारतींच्या पार्किंगमध्ये ई वाहन चार्जिंग सुविधेसह पार्किंग स्लॉट राखीव ठेवणे बंधनकारक – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

महाराष्ट्र’ इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१’ ची अंमलबजावणी सुरू

by nagesh
 Pune Garbage Depots Uruli Devachi - Fursungi | Transformation of Uruli Devachi-Fursungi Garbage Depot in last 20 years! To be developed as a tourist destination for scholars; Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | महापालिकेच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ अंतर्गत नवीन निवासी
इमारतींना बांधकाम परवानगी देताना इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग सुविधा देण्याची अट घालण्यात आली आहे. यापुढे महापालिकेच्यावतीने बांधकाम
परवानगी देतानाच पार्किंगमध्ये २० टक्के जागा ई वाहन चार्जिंगसाठी ठेवणे बंधनकारक राहील, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC
Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी आज दिले आहेत. (Pune PMC News)

 

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल समितीने जुलै २०२१ मध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणाला अनुषंगुन महापालिकेने ई वाहनांबाबत धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार १५ जुलै २०२२ पासून नवीन निवासी इमारतींना बांधकाम परवानगी देताना मान्यतेच्या अटींमध्ये विद्युत महामंडळाकडून इलेक्ट्रीक वाहन चार्जिंगसाठी अतिरिक्त वीज लोड मान्य करून घेण्याची अट विकसकाला घातली आहे. यासोबतच निवासी इमारतीच्या बांधकाम प्रस्तावामध्ये २० पेक्षा अधिक चार चाकी वाहनांसाठी पार्किंग संख्या असेल तर त्याच्या २० टक्के वाहनांसाठी अर्थात चार वाहनांसाठी इलेक्ट्रीक चार्जिंग पॉईंट ठेवणे व या २० टक्क्यांपैकी ३० टक्के क्षेत्र हे सामायिक पार्किंग क्षेत्रामध्ये असणे बंधनकारक राहाणार आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवीन व्यावसायीक, शैक्षणिक संस्था, शॉपिंग मॉल्स, मल्टीप्लेक्स, हॉटेल्स, हॉस्पीटल, आयटी पार्कच्या प्रस्तावित बांधकाम प्रस्तावामध्ये ५० पेक्षा अधिक मोटारींसाठी पार्किंग सुविधा असल्यास अशा मिळकतींमध्ये पार्किंगच्या २५ टक्के पार्किंग चार्जिंग पॉंईटसह राखीव ठेवणे बंधनकारक राहाणार आहे.
यासोबतच सध्या अस्तित्वातील वरिल संस्थांना देखिल एकूण पार्किंगच्या १० टक्के पार्किंग स्पेसवर सुसज्ज चार्जिंग व्यवस्था राखीव ठेवणे बंधनकारक राहाणार आहे,
असे विक्रम कुमार यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

Web Title : –  Pune PMC News | Mandatory reservation of parking slots with e-vehicle charging facility in parking lot of commercial and service buildings including new residential buildings Vikram Kumar Municipal Commissioner

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava 2022 | हिंदुत्वाचा मुखवटा निखळून पडला, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले ! शिंदे गटाने अर्ज दाखल करुन ठाकरे गटाला दिले आव्हान

 

Related Posts