IMPIMP

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले ! शिंदे गटाने अर्ज दाखल करुन ठाकरे गटाला दिले आव्हान

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन सध्या दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) संघर्ष सुरु झाला आहे. मागील अनेक वर्षापासून दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park in Mumbai) होतो. मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांनी आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. तसेच दसरा मेळावा घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2022) परवानगीसाठी शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) अर्ज करण्यात आला आहे. यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी हा अर्ज दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापत चालले आहे.
दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे.
त्यानुसार शिवाजी पार्कातच दसरा मेळावा होणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
आमचीच शिवसेना खरी असा दावा करणारा शिंदे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दावा करेल याची कुणकुण असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची घोषणा केली.
परंतु त्यानंतर आजपर्यंत शिंदे गटाकडून कोणतेही अधिकृत पाऊल उचलण्यात आले नाही.
मात्र आज शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

 

विशेष म्हणजे शिवसेनेने यापूर्वीच शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेकडे
अर्ज दाखल केला असून पालिका प्रशासनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
आता शिंदे गटाने अर्ज केल्यामुळे महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

 

Web Title : –  Dasara Melava 2022 | finally application from shinde group to mumbai municipal corporation for dasara melava sada saravankars application for shivaji park ground

 

हे देखील वाचा :

LIC New Pension Plan | LIC ने लाँच केला शानदार प्लान ! केवळ एकदाच जमा करा पैसे, आयुष्यभर मिळेल पेन्शन; येथे जाणून घ्या पूर्ण माहिती

ACB Trap | पोलीस ठाण्याच्या आवारात 2 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Pavana Dam | दुर्दैवी ! पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू

 

Related Posts