IMPIMP

Pune PMC News | पुण्यात बायोमेट्रीक नोंदणी केलेल्या 22889 पथारी व्यावसायीकांपैकी तब्बल 10674 व्यावसायीक व्यवसायच करत नाहीत

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पथारी व्यावसायीक समिती निवडणुकीच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती उजेडात

 

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेच्यावतीने पथारी व्यावसायीकांच्या (Street Tenders) समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आठ सदस्य निवडीसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार आहे. बायोमेट्रीक नोंदणी असलेल्या पथारी व्यावसायीकांची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. विशेष असे की ही मतदार यादी तयार करताना नोंदणीकृत सुमारे २२ हजार ८८९ व्यावसायीकांपैकी निम्मेच अर्थात सुमारे ११ हजार ४२२ व्यावसायीक प्रत्यक्ष व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार यादीमध्ये नसलेल्यांचे बायोमेट्रीक परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप (PMC Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्र शासनाच्या पथारी व्यावसायीकांच्या धोरणांनुसार पथारी व्यावसायीकांची स्थापन करण्यासाठी ८ सदस्यांची निवड मतदानाद्वारे करण्यात येणार आहे. महापालिकेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून मतपत्रिकेचा वापर करून ४ डिसेंबरला क्षेत्रिय कार्यालयनिहाय उभारण्यात येणार्‍या केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रशासनाने मतदार यादीदेखिल अंतिम केली आहे. शहरामध्ये मागील काही वर्षांपुर्वी करण्यात आलेल्या पथारी व्यावसायीकांच्या सर्वेक्षणामध्ये २२ हजार ८८९व्यावसायीकांची बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आली आहे. मतदारयादी अंतिम करताना प्रशासनाने पुन्हा सर्व व्यावसायीकांचे सर्वेक्षण केले. वर्तमान पत्रांमध्ये दोन वेळा निवेदन प्रसिद्ध करून तसेच पथारी व्यावसायीक संघटनांच्या माध्यमांतूनही व्यावसायीकांना वेळोवेळी आवाहन करुन त्यांचा व्यवसाय सुरू असल्याबाबतचे पुरावे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. सुमारे १०५ व्यावसायीकांनी महापालिकेशी संपर्क साधून पुरावे दिल्यानंतर त्यांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. (Pune PMC News)

 

अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली असून सुमारे ११ हजार ४२२व्यावसायीक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होउन मतदानही करू शकणार आहेत. तर बायोमेट्रीक नोंदणी असतानाही व्यवसाय करत नसल्याचे १० हजार ६७४, एकापेक्षा अधिक परवाने घेतलेले (दुबार) २६४ आणि प्रमाणपत्र रद्द केलेल्या १३८ व्यावसायीकांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. बायोमेट्रीक नोंद असतानाही जागेवर व्यवसाय करत नसलेल्या व्यावसायीकांचे परवाने रद्द करण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

२ नोव्हेंबर – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे
२ आणि ३ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्राचे वाटप करणे
९ आणि १० नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्र स्वीकारणे
११ नोव्हेंबर- नामनिर्देशन पत्रांची छाननी
१४ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्रांवरील आक्षेप, हरकती स्वीकारणे
२१ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्र मागे घेणे
२२ नोव्हेंबर – अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे
४ डिसेंबर – मतदान
५ डिसेंबर – मतमोजणी (गणेश कला क्रिडा मंच)

 

Web Title :- Pune PMC News | Out of 22889 Biometrically registered Pathari traders in Pune, as many as 10674 are not doing business

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | मी दादा कोंडकेंचे चित्रपट बघतो त्यामुळे द्वीअर्थी बोलणारच – गुलाबराव पाटील

Anil Parab | अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही 99% मतांनी जिंकू – अनिल परब

आता रोख पैसे जवळ ठेवायची गरज नाही! RBI ने केली Digital Rupee ची सुरुवात

Pune PMC News | ‘बेकायदा फ्लेक्स, बॅनर आणि भित्तीचित्र लावल्यास एक हजार रुपये दंड, ‘फाईन’ न भरल्यास मिळकतींवर बोजा चढविणार’ – पुणे महापालिका

 

Related Posts