IMPIMP

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

by nagesh
 Pune Garbage Depots Uruli Devachi - Fursungi | Transformation of Uruli Devachi-Fursungi Garbage Depot in last 20 years! To be developed as a tourist destination for scholars; Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC News | सायकलींच्या पुणे शहरामध्ये सायकल चालविण्यास प्राधान्य देण्यासाठी मागील दहा ते बारा वर्षांपासून वेगवेगळे प्रयत्न करणार्‍या पुणे महापालिकेला यामध्ये यश आलेले नाही. यामुळेच पुणे महापालिकेने यापुढील काळात अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून ‘सायकल ट्रॅक’ वगळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याऐवजी रस्त्यावरंच ठराविकवेळेत एक भाग खास सायकलस्वार आणि मॉर्निंग वॉकसाठी उपलब्ध करून देण्याबाबत ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यास सुरूवात केली आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून पुण्याची ओळख होती. शहराचा विस्तार होत असताना प्रवासाची नवनवीन वाहने येत गेल्याने रस्ते वाहनांनी गजबजून गेले. प्रामुख्याने सायकलींची जागा दुचाकींनी घेतली असून आजमितीला ३० लाखांहून अधिक दुचाकी रस्त्यावर धावतात. साधारण १४ वर्षांपुर्वी शहरात राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर निधी आला होता. त्यावेळी पर्यावरण पूरक सायकलींचा वापर वाढविण्यासाठी रोड डिझाईन करताना सायकल ट्रॅकचेही नियोजन करण्यात आले. तेंव्हापासून महापालिकेेने आजपावेतो शहरातील विविध भागातील मोठ्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खचून ४२ कि.मी.चे सायकल ट्रॅक निर्माण केले आहेत. (Pune PMC News)

 

यासोबतच नुकतेच पाच वर्षांपुर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत ‘सायकल योजना’ही आणली होती. या योजनेअंतर्गत तीन हजारांहून अधिक सायकल ऍपच्या माध्यमांतून भाडेतत्वावर देण्याचा प्रयोगही राबविला. परंतू हा प्रयोगही प्रतिसादाअभावी गुंडाळावा लागला.

 

शहरामध्ये आजही व्यायामासाठी आणि दैनंदीन सायकलचा वापर करणार्‍यांची संख्या मोठी आहे.
यामध्ये हौशी सायकलपटूंसोबतच विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.
मात्र, ही मंडळी देखिल सायकल ट्रॅक ऐवजी रस्त्यांचाच वापर प्रामुख्याने करतात.
सलग सायकल ट्रॅक नसते. सायकल ट्रॅक आणि पदपदांवरील अतिक्रमण, अन्य वाहनांनी प्रवेश करू नये म्हणून उभारलेले बोलार्डस यामुळे सलग १०० मीटरपर्यंतही सायकल चालविणे कठीण असल्याने सायकल ट्रॅकचा वापर अगदी नगण्य असल्याचे प्रशासनाच्या अभ्यासातून समोर आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने यापुढे नवीन सायकल ट्रॅक तयार करण्यास ब्रेक लावण्याची मानसिकता केली आहे.
त्याऐवजी सकाळी व संध्याकाळी रस्त्याचा काही भाग सायकल ट्रॅक म्हणून वापरता येईल का.
तसेच अन्य काही उपाययोजना करता येतील का याची चाचपणी सुरू केली आहे.
सायकलस्वारांसोबतच मॉर्निंग वॉकसाठीही या विशेष ट्रॅकचा वापर करता येईल का हे देखिल तपासून पाहाण्यात येत
आहे. महापालिकेच्या संबधित अधिकार्‍यांना याबाबत नागरिकांच्या सुचनां जाणून घेउन परिपूर्ण अहवाल तयार
करण्यास सांगितले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

 

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation (PMC) move to exclude cycle tracks from urban street design as they are no longer in use

 

हे देखील वाचा :

Sambhaji Raje | CM शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दीड तास ताटकळत उभे ठेवले

Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | टक्केवारीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, माझ्याकडे पुरावे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Vitamin-C | केवळ लिंबू आणि संत्र्यातच नव्हे, ‘या’ 5 फूड्समध्ये सुद्धा असते व्हिटॅमिन-सी चे भरपूर प्रमाण

 

Related Posts