IMPIMP

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकत करातील 40 टक्के सवलतीचा अध्यादेश राज्य शासनाने काढला ! देखभाल दुरूस्तीसाठीची 2010 पासूनची 5 टक्के वजावटही माफ; 1 एप्रिलपासून देखभाल दुरूस्तीची 10 टक्के आकारणी

by nagesh
 Pune PMC Property Tax News | Now the municipal corporation's march to the income tax arrears! Will seal the income of big arrears, charge the businessmen for change of use

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Property Tax | पुणेकरांना निवासी मिळकत करामध्ये ४० टक्के कर सवलत २०१९ पासून लागू करण्यात यावी. तसेच निवासी व बिगरनिवासी मिळकत करामध्ये २०१० पर्यंंत देण्यात येणारी देखभाल दुरूस्तीची वजावट १५ ऐवजी १० टक्के करून यातील फरकाची अर्थात ५ टक्के सवलत चालू आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून लागू करावी. २०१० पासून आकारण्यात आलेली ही ५ टक्के सवलत माफ करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने (Maharashtra State Govt) काढला आहे. या अध्यादेशाचा लाभ पाच लाखांहून अधिक मिळकत धारकांना होणार असून यामुळे महापालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) उत्पन्न सुमारे १५० कोटी रुपयांनी घटणार आहे. (Pune PMC Property Tax)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणेकरांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मिळकत करात दिली जाणारी चाळीस टक्क्याची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महापालिकेला मिळकत करातून मिळणार्‍या उत्पन्नात घट होणार आहे. महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार २०१९ पासून मिळकत करात देण्यात येणारी चाळीस टक्क्याची सवलत रद्द केली होती. २०१९ पासून नव्याने कर आकारणी झालेल्या सुमारे १ लाख ६५ मिळकतधारकांकडून १०० टक्के कर आकारणी करण्यात येत होती. तर त्यापुर्वी आकारणी झालेल्या मिळकतींना वाढीव कराच्या नोटीसेस पाठविण्यास सुरूवात झाली होती.

 

यावरून पुणेकरांमध्ये असंतोष पसरल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांनी वाढीव कर भरू नये, असे आवाहन केले होते. परंतू ४० टक्के सवलत पुर्ववत करण्याबाबत निर्णय होत नव्हता. मात्र, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये (Kasba Peth Bypoll Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) यावरून रान उठविले. कसबा निवडणुकीत भाजप (BJP) उमेदवाराचा पराभव होण्यास रद्द केलेली सवलत कारणीभूत ठरल्याची जोरदार चर्चा झाली. अखेर महाविकास आघाडी, मनसेसह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार मागणी लावून धरल्यानंतर राज्य शासनाने नुकतेच ४० टक्के कर सवलत पूर्ववत देण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune PMC Property Tax)

 

राज्य सरकारच्या निर्णयामुळे या मिळकतदारांना फायदा होणार आहे. त्यांना २०१९ पासून चाळीस टक्क्याची सवलत मिळणार आहे. त्यांच्याकडून वसुल केलेली अतिरीक्त रक्कम ही पुढील बिलाच्या रक्कमेतून वजावट केली जाणार आहे. यामुळे साधारणपणे दिडशे कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होईल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाडेतत्वावरील मिळकतींना लाभ नाही
चाळीस टक्क्याची सवलत ही मिळकतदार हा स्वत: राहण्यासाठी मिळकतीचा वापर करीत असेल तरच दिली जाते. यामुळे २०१९ नंतर नव्याने नोंदणी झालेल्या मिळकतींच्या वापराविषयीची माहीती प्रशासनानाला गोळा करण्यासाठी सर्व्हेक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी दस्त नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी झालेले भाडेकरार, पोलिसांकडे नोंद असलेल्या भाडे कराराची माहीती घेतली जाणार आहे. मिळकत जर भाडेतत्वावर दिली असेल तर , मिळकतदारांनी शंभर टक्के मिळकत कर भरला पाहीजे. जर त्याने भरला नसेल तर त्याच्याकडून दंडासहीत तो वसुल केला जाईल असे अतिरीक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी सांगितले. राज्य शासनाच्या आदेशानुसार नवीन बिलांची छपाई करून वाटप केले जाईल. तसेच नागरिकांनी १ मे नंतर ऑनलाईन बिले पाहून महापालिकेकडे भरणा करावा.

 

– कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (IAS Kunal Khemnar, Additional Municipal Commissioner)

1. राज्य सरकारकडून चाळीस टक्के सवलतीच्या निर्णयास उशीर झाला. हा निर्णय होणार असल्याने महापालिकेने नवीन बिले काढणे आणि पाठविण्याचे काम थांबविले होते. त्याचा परीणाम मिळकत कराच्या उत्पन्नाच्या वसुलीवर झाला आहे. पहील्या महीन्यात केवळ वीस कोटी रुपये जमा झाले आहेत.

 

2. २०१९ पुर्वी चाळीस टक्के सवलतीचा लाभ घेणार्‍या काही मिळकतदारांनी जर २०१९ नंतर शंभर टक्के कर भरला असेल, तर त्यांच्याकडुन घेतली गेलेली अतिरीक्त रक्कमही पुढील बिलातून वजावट केली जाणार आहे.

 

3. मिळकत कर वेळेत भरणार्‍यांना महापालिकेकडून सवलत दिली जाते. यंदा ही मुदत जुन महीन्यापर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. पुर्वी ही मुदत ३१ मेपर्यंत दिली जात होती. ती यंदा जुनअखेरपर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation: The state government issued an ordinance for 40 percent discount in income tax! 5 percent deduction for maintenance repairs since 2010 also waived; 10 percent levy on maintenance repairs from April 1

 

हे देखील वाचा :

Roll Ball World Cup Tournament In Pune | सहावी विश्वकरंडक रोलबॉल स्पर्धा ! चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन; पुरुष गटातून भारताची विजयी सलामी (Video)

Maharashtra Political News | ‘…आता लपून छपून कशाला, अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

Pune RTO News | उबेरसह चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

NCP Chief Sharad Pawar | ‘त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही’, शंका व्यक्त करत शरद पवारांनी केली ‘ही’ मागणी

 

Related Posts