IMPIMP

Pune PMC WhatsApp ChatBot Services | महानगरपालिकेच्या व्हाटस अप चॅट बॉट सेवा सुरु ! PMC च्या सर्व सेवा आता ‘व्हाटस् ऍप क्र. 8888251001 वर

by nagesh
 Pune PMC WhatsApp ChatBot Services | Pune Municipal Corporation's WhatsApp chat bot service launched! All services of PMC are now available on 'WhatsApp no. on 8888251001

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC WhatsApp ChatBot Services | पुणे महापालिकेने सुरु केलेल्या व्हाटस अप चॅट बॉट या सेवेत आता नागरीकांशी निगडीत १९ विभागातील ८० सेवा उपलब्ध केल्या गेल्या आहेत. अशा प्रकारे व्हाटस अपच्या माध्यमातून नागरीकांना सेवा देणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. (Pune PMC WhatsApp ChatBot Services)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सप्टेंबर महीन्यात महापालिकेने या सेवेला सुरुवात केली होती. महापालिकेच्या विभागांमार्फत अनेक सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये नागरी सेवा सुविधा, विभिन्न विभागांनी बिले भरणे, परवाना काढणे परवानगी घेणे, विविध दाखले ना हरकत प्रमाणपत्र अशी अनेक प्रकारची माहिती नागरिकांना सहजपणे या व्हाटस अप चॅट बॉट सेवेच्या माध्यमातून चोवीस तास मिळू शकेल. नागरिकांना या सुविधा पुणे महापालिकेचा ८८८८२५१००१ हा मोबा नंबर सेव करून घेता येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिली. (Pune PMC WhatsApp ChatBot Services)

 

पुणे महानगरपालिका एका क्लिकवर माहिती देणारी भारतातील प्रथम महापालिका ठरणार आहे. त्यामध्ये विविध १९ विभागाच्या सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारची मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलक याची बिले भरता येतील. तसेच कुत्रा पाळणे परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना,नवीन नळजोडणी अर्ज आदी परवाने मिळू शकतील. जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर ना हरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तंातरण, वारसाहक्क हस्तांतरण आदी प्रमाणपत्रे मिळू शकतील. या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याची सोय केली आहे. तक्रारची सद्यस्थिती पाहणेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मद्यस्थितीत नागरिकांकरिता खाली नमूद तक्रारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महापालिकेकडून राबविल्या जाणार्‍या शहरी गरीब आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना,
पंतप्रधान आवास योजना,प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, मागासवर्गीय कल्याणकारी योजना,
अपंग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना, महिला सक्षमीकरण योजना,
युवक कल्याणकारी योजनांची माहीती दिली गेली आहे.

 

Web Title :- Pune PMC WhatsApp ChatBot Services | Pune Municipal Corporation’s WhatsApp chat bot service launched! All services of PMC are now available on ‘WhatsApp no. on 8888251001

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | सलग 63 किलोमीटर स्केटींग करुन पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांचा विक्रम

Pune Crime | चायनीज मांजा विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हे शाखेची कारवाई

Pune CNG Price Hike | पुणेकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीचे दर वाढले

 

Related Posts