IMPIMP

Pune Police Combing Operation | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती; 27 कोयते जप्त, 37 जणांना अटक

by nagesh
 Pune Crime News | 9th MCOCA Action by Commissioner of Police Ritesh Kumaarr against Pune Criminals; Umesh Waghmare and his gang booked under mokka

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police Combing Operation | पुण्यात वाढती गुन्हेगारी आणि येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करुन शहरातील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पुणे पोलिसांनी मध्यरात्री कोम्बींग ऑपरेशनमध्ये (Pune Police Combing Operation) सराईतांची चौकशी करण्यात आली. तसेच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या 37 जणांना अटक (Arrest) केली. यामध्ये तीन अल्पयीन मुलांचा (Pune Crime) समावेश आहे. अटक करण्यात सराईत गुन्हेगारांकडून 27 कोयते, चाकू, कुऱ्हाड, तलवार जप्त करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stop), रेल्वे स्टेशन (Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3383 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 709 गुन्हेगार मिळून आले आहेत.बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी ३७ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २७ कोयते, चाकू, कुऱ्हाड, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

 

पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
खंडणी विरोधी पथकाने शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी परिसरात छाप टाकून सुरेश कलाधर (वय- 59)
याच्याकडून चाल लाख 22 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.
कोंढवा येथील एका हुक्का पार्लवर छापा टाकून सुगंधी तंबाखू, हुक्कापात्र जप्त करण्यात आले.
बेकायदा हुक्का पार्लर चालविल्या प्रकरणी हॉटेल मालक प्रकाशसिंग नरसिग चौहान (वय-39) याला अटक केली आहे.

 

 

मार्केट यार्ड परिसरता गांजा विक्री करणाऱ्या चाँद शेख याला अटक करुन एक किलो 930 ग्रॅम गांजा जप्त केला.
तसेच दुचाकी मोबाईल जप्त केला. कोंढवा भागात असीफ अतीक मेनन (वय-22) याला गांजा विक्री करताना अटक करण्यात आली.
त्याच्याकडून 597 ग्रॅम गांजा जप्त केला. तर वाहतूक शाखेने संशयित वाहन चालकांना चेक करुन दंडात्मक कारवाई केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशान्वये पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
अपर पोलीस आयुक्त गुन्ह रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 संदीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill), पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borat),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग विजयकुमार मगर (Traffic Branch DCP Vijayakumar Magar)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

 

Web Title :- Pune Police Combing Operation | Criminals busted by Pune Police in the wake of Republic Day; 27 coins seized, 37 people arrested

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | महापालिकेचा विद्युत विभाग सी.एस.आर.च्या नावाखाली ठेकेदारांच्या मानगुटीवर खर्च लादतो

Pune Crime News | जामीनावर सुटताच पुन्हा अंमली पदार्थाची तस्करी, टांझानीयन नागरिकाला गुन्हे शाखेकडून अटक; 7 लाखाचे कोकेन जप्त

Beed News | व्हॉट्सअॅवर ‘आय एम सॉरी’ स्टेटस ठेवून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याने उचललं टोकाचं पाऊल

 

Related Posts