IMPIMP

Pune Police MCOCA Action | घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या सुंदरसिंग भुरीया व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 90 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MCOCA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MCOCA Action | खडकी परिसरात घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या सुंदरसिंग भुरीया व त्याच्या 3 साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 90 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आरोपींनी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला धक्काबुक्की करुन जबरदस्तीने 2100 रुपये काढून घेतले होते. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी बोपोडी येथील भाऊ पाटील रोडवर घडली होती. याप्रकरणी टोळी प्रमुख सुंदरसिंग भयानसिंग भुरीया Sundar Singh Bhayan Singh Bhuria (वय-25), मुकेश ग्यानसिंग भुरीया Mukesh Gyansingh Bhuria (वय-27 दोघे रा. ग्राम पिपराणी, जि. धारा मध्य प्रदेश), सुनिल कमलसिंग आलावा (वय-28), हरसिंग वालसिंग ओसनिया (वय-22 दोघे रा. तहसील कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा, उत्तर प्रदेश) यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

टोळी प्रमुख सुंदरसिंग भुरीया याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता त्याने चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तसेच त्याने गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार केली. या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाक दाखवून गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, आरोपींच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांनी असे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. (Pune Police MCOCA Action)

खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे
कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Sr PI Rajendra Sahane)
यांनी परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, तत्कालीन सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील
(PI Mansingh Patil), पोलीस उप निरीक्षक संजय भांडवलकर (PSI Sanjay Budrukar),
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magadum), सर्वेलन्स अंमलदार रमेश जाधव,
महिला पोलीस अंमलदार किरण मिरकुटे व स्वाती म्हस्के यांच्या पथकाने केली.

Related Posts