IMPIMP

Pune Police MPDA Action | खडकीमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 71 वी स्थानबध्दतेची कारवाई

by sachinsitapure
Pune Police MPDA Action

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police MPDA Action | खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे करुन खडकी परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार अजय उर्फ कावू शिवकुमार पिल्ले (वय-28 रा. नाईक चाळ, बोपोडी,पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 71 वी कारवाई आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आरोपी अजय उर्फ कावू पिल्ले खडकी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, तलवार, चाकू या सारख्या जिवेघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते.

अजय उर्फ कावू पिल्ले याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) कारवाई करण्याचा प्रस्ताव
पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी
करुन पोलीस आयुक्तांनी अजय उर्फ कावू पिल्ले याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात
(Amravati Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Sr. PI Rajendra Sahane), गुन्हे शाखा,
पी.सी.बी. चे (Crime Branch P.C.B.) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre),
पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Related Posts