IMPIMP

Gujarat High Court | दुसरा पुरुष असो किंवा पीडितेचा पती, बलात्कार हा बलात्कारच : हायकोर्ट

by sachinsitapure
Gujarat High Court

अहमदाबाद : Gujarat High Court | गुजरातच्या राजकोटमध्ये एका महिलेवर पतीने बलात्कार (Rape Case) केला, तसेच तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड (Nude Video Record) करून ते पोस्ट केले होते. या प्रकरणी राजकोट पोलिसांनी (Rajkot Police) गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. या संदर्भात महिलेकडून दाखल याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) म्हटले की, पतीने केलेला बलात्कारही बलात्कारच असतो. बार अँड बेंचने हे वृत्त दिले आहे.

न्यायमूर्ती दिव्येश जोशी (Justice Divyesh Joshi) यांनी निकालात म्हटले की, पतीने जरी त्याच्या पत्नीवर बलात्कार केला तरीही तो बलात्कारच आहे. तो त्या महिलेचा पती आहे म्हणून कुठलीही सूट मिळू शकत नाही. बलात्कार करणारा दुसरा पुरुष असो किंवा पीडितेचा पती असो बलात्कार हा बलात्कारच असतो.

गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) म्हटले की, पीडितेने जर सांगितले की तिच्यावर पतीने बलात्कार केला, तर तो बलात्कारच असतो. अनेक देशांमध्ये वैवाहिक बलात्कार (Marital Rape) हा गुन्हा आहे.

न्यायाधीश दिव्येश जोशी यांनी ८ डिसेंबरच्या आदेशात म्हटले आहे की अमेरिकेतील ५० राज्यांमध्ये, ऑस्ट्रेलियातल्या तीन राज्यांमध्ये तसेच कॅनडा, इस्रायल, फ्रान्स, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, सोव्हियत संघ, पोलंड, झेकोस्लोवाकिया आणि अनेक देशांमध्ये वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे.

न्यायालयाने म्हटले की, युनायटेड किंग्डममध्ये जे कायदे आहेत त्यांच्या मोठा प्रभाव भारतीय दंड संहितेवर आहे.
कुठल्याही व्यक्तीने महिलेचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केले किंवा तिच्या बलात्कार केला
तर आयपीसी म्हणजेच भारतीय दंड संहितेनुसार कलम ३७६ नुसार शिक्षेस पात्र आहे.

न्यायालयाने म्हटले की, लैंगिक शोषण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यातला सर्वात भयंकर प्रकार बलात्कार आहे.
लैंगिक शोषण हा जसा गुन्हा आहे, त्याचप्रमाणे बलात्कार हा गुन्हा आहेच तो त्या महिलेच्या पतीने केला असेल तरीही
तो बलात्कारच आहे आणि गुन्हाच आहे. लैंगिक हिंसेच्या किंवा वैवाहिक बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये महिलांनी मौन
सोडणे आवश्यक आहे.

न्यायालयाने असेही म्हटले की, अनेकदा महिला बदनामीच्या भीतीने, समाजात बहिष्कृत केले जाईल या भीतीने,
आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असल्याने वैवाहिक बलात्कारासारख्या गोष्टीमध्ये शांत राहतात.
त्यांनी हे मौन बाळगू नये. त्यांनी मौन सोडून अशा प्रकारांना वाचा फोडली पाहिजे.

गुजरात उच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर महिलेच्या पतीने जामीन
मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती जी न्यायालयाने फेटाळली आहे. महिलेने दाखल केलेल्या याचिकेनुसार
तिच्या पतीने तिच्यावर बलात्कार केला होता, तसेच तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करुन ते पोस्ट केले होते.
राजकोट पोलिसांनी या प्रकरणात सायबर गुन्हे शाखेला कळवले आणि त्यांनी या प्रकरणी संयुक्त कारवाई केली होती.
याबाबतच निर्णय उच्च न्यायालयाने देताना वरील वक्तव्य केले.

Related Posts