IMPIMP

Pune Police News | ‘पुणे तिथे काय उणे ! ‘साहेब, मासे आणायला गावी जायचंय, सुट्टी द्या’; ‘खडक’ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याचं ‘कडक’ पत्र व्हायरल

by nagesh
Pune Police News | pune khadak police station head constable letter for leave goes viral social media

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police Constable Letter For Leave Goes Viral | सुट्ट्यांच्या कारणांबाबतचे काही किस्से आपण याआगोदरही ऐकले असतील. असाच एक किस्सा पुण्यातील (Pune Police News) एका पत्राने समोर आला आहे. म्हणतात ना..’पुणे तिथे काय उणे’..पुण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या (Pune Police Head Constable) सुट्टी बाबतच्या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे. गावाकडून मासे आणायला जाण्यासाठी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Senior Police Inspector) लिहिलं आहे. (Pune Police News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खडक पोलिस ठाण्यातील (Khadak Police Station) कर्मचारी एस. डी. शिंदे (S. D. Shinde) यांच्या नावानं हे पत्र आहे. शिंदे यांनी सुट्टी मिळावी यासाठी एका वेगळ्या शैलीत आपल्या वरिष्ठांना पत्र लिहिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या सहकाऱ्यांना चिलापी आणि रव मासे (Chilapi Fish) घेऊन यायचे कारण देत या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राची चर्चा मात्र सर्वत्र पसरली आहे. (Pune Police News)

 

दरम्यान, मासे आणायचे कारण देत दोन दिवस सुट्ट्या द्या असं पत्रात दिलेल्या मजकुरात नमूद करण्यात आलंय. तसेच, या पत्राबाबत वरिष्ठ पोलिसांना विचारले असता आमच्याकडे असं पत्र अजून आलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होताना दिसत आहे.

 

Web Title :- Pune Police News | pune khadak police station head constable letter for leave goes viral social media

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Nilesh Rane On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा Finance विषय कच्चा; अर्थखातं हे बुद्धिमान व्यक्तीकडे असायला हवं’ – भाजप नेते निलेश राणे

ED Notice To Avinash Bhosale | प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या अडचणीत भर; आता ED कडून नोटीस

 

Related Posts