IMPIMP

Nilesh Rane On Ajit Pawar | ‘अजित पवारांचा Finance विषय कच्चा; अर्थखातं हे बुद्धिमान व्यक्तीकडे असायला हवं’ – भाजप नेते निलेश राणे

by nagesh
Nilesh Rane On Ajit Pawar | bjp leader nilesh rane slams ncp leader and finance minister ajit pawar over gst

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन Nilesh Rane On Ajit Pawar | जीएसटीच्या (GST) परताव्याच्या रक्कमेवरुन केंद्रातील भाजप सरकार (BJP
Government) आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra State Government) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी थेट
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे.
(Nilesh Rane On Ajit Pawar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

“अर्थमंत्री हे पद बुद्धिमान माणसाकडे असावं,” असा उपरोधिक टोला निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे. “अजित पवार म्हणतात GST चे 50 टक्के पैसे मिळाले अजून 15 हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र पाच लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GST च्या 30/40 हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं,” असं निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुढे निलेश राणे म्हणाले, “सगळी चर्चा GST वर पण ठाकरे सरकारने दोन वर्षात दोन लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर लादलं आहे या विषयावर कोण बोलत नाही. 2 वर्षात महाराष्ट्राला दोन लाख कोटींनी गरीब करणारं सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज 50 हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसं हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

 

Web Title :- Nilesh Rane On Ajit Pawar | bjp leader nilesh rane slams ncp leader and finance minister ajit pawar over gst

 

हे देखील वाचा :

ED Notice To Avinash Bhosale | प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या अडचणीत भर; आता ED कडून नोटीस

Maharashtra Monsoon Update | आगामी 2 दिवसांत मोसमी पाऊस कोकणात; ‘या’ दिवशी मुंबईत बरसणार – IMD

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

 

Related Posts