IMPIMP

Pune Smart City Project | स्मार्ट सिटीच्या बेफिकिरी मुळे नागरिकांना भुर्दंड! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा घरचा आहेर

by nagesh
Pune Smart City Project | Citizens are disgusted due to insecurity of Pune Smart City ruling BJP corporator said

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या (Pune Smart City Project) भ्रमाचा भोपळा पुर्वीच फुटला आहे. केंद्र सरकारने
ही योजना गुंडाळली असली तरी शेवटच्या टप्प्यात सुरू असलेल्या कामांकडेही स्मार्ट सिटीचे (Pune Smart City Project) लक्ष नसल्याचे समोर येत
आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौक (Law College Road Athavale Chowk) सुशोभिकरणाच्या कामाच्या ‘गचाळ’ नियोजनाचा फटका स्थानीक नागरिकांना बसत असून नुकतेच एक ज्येष्ठ नागरिक याठिकाणी अपघातात जायबंदी झाल्याने स्थानीक नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे (Corporator Madhuri Sahasrabudhe) यांनी या कामावर सडकून टीका करत घरचा आहेर दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लॉ कॉलेज रस्त्यावरील आठवले चौकात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महिन्याभरापासून चौक सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट पदपथ बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच पाच रस्ते एकत्र येत असलेल्या या चौकामध्ये स्मार्ट सिग्नलसाठी केबल टाकण्याकरिता रस्त्यांवर चर खोदण्यात आले आहेत. या सर्व कामांसाठी वापरण्यात येणारे क्रश्ड सँड आणि राडारोडा रस्त्यावर पसरला आहे. याठिकाणी काय काम सुरू आहे, याचे साधे फलकही लावण्यात आलेले नाहीत. (Pune Smart City Project)

या बेपर्वाईचा फटका ज्येष्ठ मधुमेहतज्ञ (Senior Diabetologist) मदन फडणीस (Dr. Madan C Phadnis) यांना बसला आहे.
हेल्मेट परिधान करून दुचाकीवर साधारण वेगाने निघालेल्या डॉ. फडणीस यांची दुचाकी या राड्यारोड्यावरून घसरल्याने ते जायबंदी झाले.
त्यांचे तातडीने ऑपरेशन करावे लागले. केवळ निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे संपुर्ण फडणीस कुटुंबियांना शारिरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. याला केवळ स्मार्ट सिटीच कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे.

 

 

Web Title :- Pune Smart City Project | Citizens are disgusted due to insecurity of Pune Smart City ruling BJP corporator said

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2256 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ankita Lokhande Video | लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर अंकिता लोखंडे देणार Good News? खास पूजेचा व्हिडिओ झाला व्हायरल

Pune Crime | धक्कादायक ! अभिनेता बनण्याचं स्वप्न भंगल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

 

Related Posts