IMPIMP

Pune Temperature | पुण्यात ‘या’ हंगामातील सर्वात कमी किमान तापमान

by nagesh
Pune Temperature | Lowest minimum temperature of 'this' season in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Temperature | हिमालयीन पर्वतरांगावर सुरु असलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे राज्यातील किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून पुणे शहरात आज सकाळी या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात आज ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची (Pune Temperature) नोंद झाली आहे. तसेच पाषाण येथे १२ अंश सेल्सिअस, लोहगाव १४, चिंचवड १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात आज जळगाव येथे सर्वात कमी किमान तापमान १०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यात गुरुवारी सकाळी किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यात आज एकाच दिवसात १.७ अंश सेल्सिअसची घट झाली आहे.

 

आकाश निरभ्र असल्याने तसेच हवा कोरडी असल्याने सायंकाळनंतर थंड वारे वाहण्यास सुरुवात होते.
अरबी समुद्राकडून रात्री येणारे आर्द्रतायुक्त वार्‍यांना अडथळा येत असल्याने पुण्यातील रात्रीच्या तापमानात
अचानक घट झाली आहे. पुढील दोन दिवस किमान तापमानातील घट अशीच राहणार असून त्यानंतर त्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

 

Web Title :- Pune Temperature | Lowest minimum temperature of ‘this’ season in Pune

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता’ – संजय राऊत

Pune Crime | शेजारच्याने गुप्तांगाला इजा करुन ज्येष्ठाचा केला खून; पत्नीसह सामान घेऊन झाला फरार

Mumbai-Pune Expressway Accident | खोपोलीजवळ भीषण अपघात ! ५ जणांचा मृत्यु, ४ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर

 

Related Posts