IMPIMP

Sanjay Raut | ‘राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | rahul gandhi called sanjay raut and inquired about his health

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो पदयात्रा (Bharat Jodo) सध्या महाराष्ट्रात आहे. यावेळी एकेठिकाणी भाषणात राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) यांच्याविषयी भाष्य केले. त्यामुळे राज्यात भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (INC) आणि महाविकास आघाडी वाद सुरु आहेत. शिवसेनेने (Shivsena) राहुल गांधी यांच्या वक्तव्याला असहमती दर्शविली आहे. त्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधींच्या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहुल गांधी यांची यात्रा भाजपच्या जुलमी काराभाराविरोधात आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या यात्रेत महागाई, बेकारी आदी मुद्दे घेतले आहेत. महाराष्ट्रात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण राहुल गांधी यांना सावरकरांना मध्ये आणण्याचे कारण नव्हते. वीर सावरकर नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत. त्यांचा अपमान शिवसेना आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते कधीही सहन करणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद या यात्रेला मिळाला. या देशातले वातावरण हुकुमशाहीकडे नेणारे आहे.
देशाला गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारे आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयांवर त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. तरी देखील वीर सावरकरांचा विषय काढण्याचे काही कारण नव्हते. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या वर्गाला वीर सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय घडले आणि काय नाही घडले हे उकरत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी सुद्धा त्याकडे लक्ष द्यावे, असेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.

 

यात्रेतील एका सभेत राहुल गांधींनी सावरकरांनी लिहिलेला माफिनामा दाखविला.
तसेच सावरकर स्वत:ला इंग्रजांचे सेवक म्हणवून घेत होते. त्यामुळे त्यांना दरमहा पेन्शन देखील मिळत होती.
त्यांनी इंग्रजांच्या विरोधात ब्र काढला नाही. त्यामुळे त्यांना वीर म्हणणे चुकीचे आहे.
ते वीर नव्हते, असे राहुल गांधी म्हणाले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena sanjay raut on rahul gandhi remarks veer savarkar congress

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शेजारच्याने गुप्तांगाला इजा करुन ज्येष्ठाचा केला खून; पत्नीसह सामान घेऊन झाला फरार

Mumbai-Pune Expressway Accident | खोपोलीजवळ भीषण अपघात ! ५ जणांचा मृत्यु, ४ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर

Maharashtra Politics | ‘उद्धव ठाकरे, तुम्ही राहुल गांधी यांना जोड्याने मारायला निघाला होता, पण, मिठी मारून’

 

Related Posts