IMPIMP

Pune Traffic Updates News | मेट्रोच्या कामामुळे विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by nagesh
Pune Traffic Updates News | traffic rule change due metro work at university chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Traffic Updates News | आचार्य आनंदऋषीजी चौकात (विद्यापीठ चौक) मेट्रोकडून उड्डाण पुलाच्या कामाचे लवकरच नियोजन असून, मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) पुणे विद्यापीठ चौक व गणेश खिंड रस्ता परिसरातील वाहतूकीत बदल करण्याचे (Changes in Traffic) नियोजन केले आहे. हे नियोजन प्रायोगिक तत्वावर असून येत्या दोन ते तीन दिवसापासून हा बदल लागू होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (Savitribai Phule Pune University Chowk), बाणेर रस्ता (Baner Road), पाषाण रस्ता (Pashan Road), गणेशखिंड (Ganesh Khind) आणि सेनापती बापट (Senapati Bapat) रोड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Pune Traffic Updates News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

असा असेल वाहतूकीत बदल

– बाणेर – औंध रस्त्याने विद्यापीठ चौकात येणारी वाहने विना सिग्नल शिवाजीनगरकडे (Shivajinagar) डाव्या लेनने जाण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. (Pune Traffic Updates News)

– गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी याआधी कॉसमॉस बँक (Cosmos Bank) येथे यू टर्न होता. हा यू-टर्न बंद करुन सेनापती बापट रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी दिली जाणार आहे.

– चतु:श्रृंगी मंदिर (सेनापती बापट रोड) येथून विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहतूक सेनापती बापट रोड जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाणकडे वळविण्यात येणार आहे.

 

औंधकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ते

पर्यायी वर्तुळाकार मार्ग 1 – गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्याकडून पुणे विद्यापीठ, चतु:श्रृंगी पोलीस ठाणे (Chaturshringi Police Station), कस्तुरबा गंधी वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय-Pune Rural Police Headquarters) येथून उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधच्या दिशेने जावे.

(Alternative route 2) पर्यायी मार्ग 2 – पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता जंक्शन उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जावे.

पर्यायी मार्ग 3 – सेनापती बापट रोड कडून औंधच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी पाषाण रस्त्याने
अभिमानश्री सोसायटी, पाषाण रस्ता जंक्शन येथून उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी.
बाणेर रस्ता जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून
क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय.टी. आय रोडने परिहार चौकातून इच्छितस्थळी जावे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजीव गांधी पुलाकडून गणेशखिंडीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग

– ब्रेमन चौकातून डावीकडे वळून स्पायरस कॉलेज रस्ता, आंबेडकर चौक, साई चौक, उजवीकडे वळून
खडकी पोलीस स्टेशन (Khadki Police Station) रेल्वे अंडरपास डावीकडे वळून चर्च चौक,
जुना पुणे-मुंबई महामार्गाचा (Old Pune-Mumbai Highway) वाहन चालकांना वापर करता येईल.

– पुणे स्टेशन (Pune Station), कोरेगाव पार्क (Koregaon Park), मुंढव्याकडून औंधच्या दिशेने
जाणाऱ्या वाहनांनी इंजिनीअरिंग कॉलेज उड्डाणपुलावरुन, वाकडेवाडी, पोल्ट्री फार्म चौक, चर्च चौकातून
डावीकडे वळून खडकी पोलीस स्टेशन अंडरपास येथून डावीकडे वळून मरिआई मंदिर, उजवीकडे वळून गोगादेव चौक,
उजवीकडे वळून फुटबॉल ग्राऊंड, उजवीकडे वळून साई चौक, डावीकडे वळून आंबेडकर चौक, स्पायरस चौक,
ब्रेमन चौकातून इच्छित स्थळी जावे.

 

Web Title :-  Pune Traffic Updates News | traffic rule change due metro work at university chowk

 

हे देखील वाचा :

Maharashtra Budget 2023 | राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Mumbai ACB Trap | 8.50 लाख रुपये लाच घेताना BMC चा दुय्यम अभियंता ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts