IMPIMP

Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला ग्रामदैवत श्री. कसबा गणपतीला चांदीची मूर्ती अर्पण

by sachinsitapure
Silver Ganpati Idol To Kasba Ganapati

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan | मानाचा पहिला गणपती श्री. कसबा गणपतीसाठी (Kasba Ganpati) ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune) विश्वस्त आणि उत्सव प्रमुख श्री. पुनीत बालन (Punit Balan) यांनी चांदीची मूर्ती भेट दिली. पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी धारीवाल- बालन (Janhavi Dhariwal Balan) यांनी शनिवारी विधिवत पूजा करून बाप्पाची ही सुंदर आणि आकर्षक अशी चांदीची मूर्ती मंडळाचे अधक्ष्य श्रीकांत शेटे (Shrikant Shete) यांच्या कडे सुपूर्त केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असल्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात कसबा गणपतीला भाविक दर्शनासाठी आवर्जुन येत असतात. या मंदिरात गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती अधिक शोभून दिसेल या विचाराने आणि गणपती बाप्पावर असलेल्या श्रद्धेतून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळा’चे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी बाप्पाची चांदीची मूर्ती भेट दिली. विधीवत पूजा करुन ती मंदिराकडे अर्पण केली. यावेळी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह इतर विश्वस्त, भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. चांदीच्या मूर्तीच्या माध्यमातून मानाच्या गणपतीची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. भविष्यातही गणपती बाप्पाची आणि बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळत रहावी, अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रीया यावेळी पुनीत बालन यांनी दिली. (Punit Balan)

Related Posts