IMPIMP

Rajya Sabha Election Results | भाजपचा प्लॅन सक्सेस ! सहाव्या जागेवर ‘धनंजय महाडिकां’चा विजय; शिवसेनेचे संजय पवार पराभूत

by nagesh
Rajya Sabha Election Results | BJP's plan success! Dhananjay Mahadik's victory in sixth place; Shiv Sena's Sanjay Pawar defeated

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajya Sabha Election Results | राज्यसभेच्या सहा जागांसाठी (Rajya Sabha Election Results) मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी एकूण 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर शनिवारी जवळपास पहाटे तीनच्या सुमारास निकाल लागला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपच्या (BJP) चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजपची खेळी यशस्वी झाली आहे. 6 व्या जागेचे भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा मोठा विजय झाला आहे. तर शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन मल्ल मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आहे. भाजपने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्याची खेळी यशस्वी झाली असून त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी, खासकरून शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिसरी जागा आम्हीच जिंकणार असा मोठा दावा भाजपकडून केला जात होता. हाच भाजपचा प्लॅन यशस्वी झालेला आहे. (Rajya Sabha Election Results)

 

राज्यसभेच्या सहा जागेसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उभी होती. शिवसेनेकडून दोन, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक-एक तसेच भाजपकडून तीन उमेदवार उभे केले होते. सहाव्या जागेसाठी यामध्ये भाजप आणि शिवसेनेत चुरस होती. मात्र त्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने आपल्या विजयाची कमान रोवली आहे.

 

भाजपचे विजयी उमेदवार –

1 पियुष गोयल (Piyush Goyal)
2. अनिल बोंडे (Anil Bonde)
3. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)

 

शिवसेनेचे विजयी उमेदवार –

1 संजय राऊत (Sanjay Raut)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काँग्रेस विजयी उमेदवार –

1. इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi)

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार –

1. प्रफुल्ल पटेल (Praful Patel)

 

Web Title :- Rajya Sabha Election Results | BJP’s plan success! Dhananjay Mahadik’s victory in sixth place; Shiv Sena’s Sanjay Pawar defeated

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Rashtrawadi Congress Party (NCP) | राष्ट्रवादी काँग्रेसचा 23 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

SBI FD Rate Hike | कर्ज महागले असताना SBI ने दिली खुशखबर, फिक्स डिपॉझिटवर जास्त मिळेल व्याज

 

Related Posts