IMPIMP

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | share market big bull rakesh jhunjhunwala will earn six times on star health and allied insurance ipo

नवी दिली : वृत्तसंस्था Rakesh Jhunjhunwala | भांडवली बाजार नियामक सेबीने 6 कंपन्यांना आयपीओ सादर करण्यास मंजूरी दिली आहे. यामध्ये दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या गुंतवणुकीची स्टार हेल्थ अँड अलाईड इन्श्युरन्स (Star Health & Allied Insurance), अदानी ग्रुपची एफएमसीजी कंपनी अदानी विल्मर (Adani Wilmar) आणि ई-कॉमर्स ब्रँड नायका (Nykaa) चा समावेश आहे.

याशिवाय पेन्ना सीमेंट इंडस्ट्रीज (Penna Cement Industries), लेटेंट व्ह्यू अ‍ॅनालिटिक्स (Latent View Analytics) आणि सिगाची इंडस्ट्रीज (Sigachi Industries) ला सुद्धा सेबीकडून (SEBI) आयपीओची मंजूरी मिळाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ऑक्टोबरमध्ये दाखवला हिरवा झेंडा

सेबीकडे या कंपन्यांनी (Rakesh Jhunjhunwala) आयपीओसाठी प्रारंभिक कागदपत्र मे ते ऑगस्ट 2021 च्या दरम्यान जमा केली होती. सेबीने 11-14 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान या कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला (Rakesh Jhunjhunwala) होता.

 सध्या सेबीकडे 52 कंपन्यांची कागदपत्रे

एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सेबीकडे सध्या 52 कंपन्यांचे आयपीओ संबंधीत कागदपत्रे जमा आहेत. कागदपत्रांनुसार, ब्यूटी एग्रीगेटर नायका चालवणारी ऑनलाइन मार्केटप्लेस एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड आयपीओ अंतर्गत 525 कोटी रुपयांचे नवीन शेयर जारी करेल.

नायका जमवणार 4,000 कोटी रुपये

तर, प्रमोटर आणि शेयरधारक सुमारे 4.31 कोटी इक्विटी शेयरसाठी ऑफर फॉर सेल (OFS) आणतील.
सूत्रांनी सांगितले की, या आयपीओतून नायकाला 3,500 ते 4,000 कोटी रुपये जमण्याची अपेक्षा आहे.

कोणती कंपनी किती इक्विटी शेयर करत आहे जारी

अदानी विल्मर आयपीओच्या अंतर्गत 4,500 कोटी रुपयांचे नवीन शेयर जारी करणार आहे.
याशिवाय स्टार हेल्थ इन्श्युरन्सच्या आयपीओ अंतर्गत 2,000 कोटी रुपयांचे नवीन शेयर जारी केले जातील.

तर, प्रमोटर आणि सध्याचे शेयरधारक 6,01,04,677 इक्विटी शेयरची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील.
हैद्राबादच्या पेन्न सीमेंटचे आयपीओ अंतर्गत 1,300 कोटी रुपयांचे नवीन शेयर जारी करण्यात येतील आणि 250 कोटी रुपयांचा ओएफएस आणला जाईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लेटेंट व्ह्यू अनालिटिक्सचे 474 कोटीचे नवीन शेयर

लेटेंट व्ह्यू अनालिटिक्स आयपीओ अंतर्गत 474 कोटी रुपयांचे नवीन शेयर जारी होतील.
तर, एक प्रमोटर आणि शेयरधारक 126 कोटी रुपयांचा ओएफएस आणतील.
सिगाची इंडस्ट्रीज आयपीओ अंतर्गत 76.95 लाख इक्विटी शेयरची विक्री केली जाईल.

Web Title: Rakesh Jhunjhunwala | earning opportunity sebi approves ipo of 6 companies including nykaa star health rupees check details marathi news

हे देखील वाचा :

Pune Mhada Lottery | घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाची 3 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी

Multibagger Stock | 320 रुपयांचा शेयर झाला 6200 रुपयांचा, गुंतवणुकदारांना दिला 1600% चा रिटर्न; जाणून घ्या पुढे सुद्धा राहणार का तेजी?

Satara Crime | नवरा-बायकोच्या भांडणामध्ये पतीनं स्वतःचं घर ‘फूकलं’, आजूबाजुच्या 10 घरांना लागली आग; 50 लाखाचं नुकसान

Related Posts