IMPIMP

Raosaheb Danve | ‘गोपीनाथ मुंडे साहेब नसते तर गावच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो’

by bali123
Raosaheb Danve | bjp leader and union minister raosaheb danve speaks over maharashtra mlc election 2022

जालना न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Raosaheb Danve | येथे गुरुवारी जन आशीर्वाद यात्रा सुरू होती. त्यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे फोटो दाखवून या यात्रेच्या विराधोत घोषणाबाजी केली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी कदाचित मुंडे साहेब राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो, अशा शब्दात मुंडे समर्थकांमध्ये बिलकुल नाराजी नसल्याचे म्हंटले एवढेच नाही तर घोषणाबाजीचा संदर्भ देत रावसाहेब दानवे यांना डॉक्टर भागवत कराड (dr bhagwat karad) यांना प्रीतम मुंडे यांना डावलून मंत्रीपद दिल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे का? असा प्रश्‍न करण्यात आला होता.

अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, यात्रेदरम्यान, ज्या लोकांना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत घोषणाबाजी केली ते लोक भाजपचेच आहे असे वाटत नाही. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात कोणीही येऊन काहीही करू शकत, असे दानवे यांनी म्हंटल आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

परभणीहून जालना जिल्ह्यात गुरुवारी भाजपची जन आशीर्वाद यात्रा प्रवेश करणार होती. या यात्रेच्या स्वागताची भाजप कार्यकत्यांनी जय्यत तयारी केली होती.
दरम्यान, स्वागतसमारंभा अगोदरच पाच ते सहा युवकांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा हातात धरून गोपीनाथ मुंडे अमर रहे तसेच भगवानगडाची गद्दारी करणाऱ्यांना गद्दारी पचत नाही असं म्हणत घोषणाबाजी केली.
पंकजा मुंडेच्या समर्थनार्थही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या.
त्यावेळी तणावाचे वातावरणाचे निर्माण झाले.
विशेष म्हणजे घोषणाबाजी करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांना कोणीही अडवले नाही.

दरम्यान, मुंडे समर्थक असणाऱ्या नितीय कायंदे या युवकाला याबाबत विचारले असता तो म्हणाला, दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाड्या, वस्ती तांड्यावर नेली.
त्यामुळे अठरा पगड जातीची पार्टी म्हणूनच भाजप ओळखली जाते, बाकी आमच्या घोषणा समजणे वालो को इशारा काफी है असं म्हटल आहे.
एकूण या मुंडे समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्याच चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

Web Title : Raosaheb Danve | union minister raosaheb danve comment gopinath munde

Maharashtra Lockdown | CM उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल’

Afghanistan Crisis | काबूल एअरपोर्टहून तालिबान्यांनी केलं 150 लोकांचे अपहरण; बऱ्याच भारतीय नागरिकांचा समावेश

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये; मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा

Related Posts