IMPIMP

Riteish Deshmukh Ved | ‘वेड’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट 30 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

by nagesh
Riteish Deshmukh Ved | riteish deshmukh shared video of first song from his upcoming film ved

सरकारसत्ता ऑनलाईन  – Riteish Deshmukh Ved | नुकताच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटांमधील रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. तर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तर आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Riteish Deshmukh Ved)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या गाण्यात रितेश देशमुख आणि अभिनेत्री जीया शंकर दिसत आहेत. तर या गाण्यात दोघांमधील रोमान्स समुद्रकिनारी चित्रित करण्यात आले आहे. गाण्यातून रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यातले प्रेम फुलताना दिसत आहे. तर या गाण्याला लोकप्रिय जोडी अजय अतुल यांनी संगीत दिले आहे.“वेड तुझा विरह वणवा” असे या गाण्याचे बोल आहेत. तर सध्या अजय अतुल यांच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे.

 

 

रितेश देशमुख ने हे गाणं सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की “प्रेमाचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा तुम्ही
त्यातला वेडेपणा अनुभवता सादर करतो आहे आमच्या सिनेमातलं पहिलं गाणं ‘वेड तुझा’
You call it Love, we call it Madness!” या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेते रितेश देशमुख यांनी केले असून जेनेलिया या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर देखील दिसणार आहेत. तर हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Riteish Deshmukh Ved | riteish deshmukh shared video of first song from his upcoming film ved

 

हे देखील वाचा :

VBA-Shivsena Alliance | पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग! ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीचा होकार; पण…

Maharashtra Police Recruitment | राज्य सरकारची मोठी घोषणा, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Pune Rickshaw Strike | ‘बोल बच्चन अधिकारी’ म्हणत संतप्त रिक्षा चालकांचे RTO अधिकाऱ्यांना साष्टांग दंडवत

 

Related Posts