IMPIMP

Robbie Coltrane Passed Away | ‘हॅरी पॉटर’ मधील हॅग्रिडची भूमिका साकारणारे रॉबी कोलट्रेन यांचे निधन

by nagesh
Robbie Coltrane Passed Away | hollywood actor robbie coltrane has died

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – हॉलिवूड (Hollywood) फिल्म इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. हॅरी पॉटर (Harry Potter) मधील
रुबियस हॅग्रिडची (Rubeus Hagrid) जबरदस्त भूमिका साकारणारे अभिनेते रॉबी कोलट्रेन शुक्रवारी निधन (Robbie Coltrane Passed Away) झाले
आहे. यामुळे रॉबी कोलट्रेन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ते 72 वर्षांचे होते. रॉबी कोलट्रेन यांची मोठी फॅन फाॅलोइंग आहे. रॉबी कोलट्रेन
यांचे भारतामध्ये देखील खूप चाहते आहेत. (Robbie Coltrane Passed Away)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रॉबी कोलट्रेन यांचा प्रवास

कोलट्रेन यांनी सुरूवातीपासूनच आयुष्यात खूप संघर्ष केला. रॉबी यांचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन (Anthony Robert McMillan) होते. इंडस्ट्रीमध्ये सतत अपयश मिळत असल्याने रॉबी यांनी स्टँड-अप कॉमेडी करण्यास सुरुवात केली. यानंतर हॅरी पॉटर या चित्रपटामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. रॉबी यांना खरी ओळख हॅरी पॉटरमुळेच मिळाली. हॅरी पॉटर चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाला पुरस्कार देखील मिळाला होता.

 

रॉबी कोलट्रेन (Robbie Coltrane Passed Away) यांनी सुरुवातीच्या काळात अनेक प्रयत्न करूनही त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते.
यानंतर त्यांनी टीव्ही मालिकांमधून आपल्या करिअरची सुरूवात केली. मात्र तिकडेदेखील त्यांना अनेक चढ- उतार पाहायला मिळाले.
यानंतर त्यांनी काही दिवस स्टँड-अप कॉमेडीयन म्हणूनही काम केले. द कॉमिक स्ट्रिप (The Comic Strip) आणि ए किक अप द एट्स (A kick up the eights) या कॉमेडी शोमध्ये रॉबी कोलट्रेन यांनी जबरदस्त अभिनय करत लोकांचे मनोरंजन केले.

 

Web Title :- Robbie Coltrane Passed Away | hollywood actor robbie coltrane has died

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | NCP खासदाराने घेतली शिंदे गटाच्या मंत्र्याची भेट, प्रतिक्रिया देताना अजित पवार पत्रकारांवर भडकले, म्हणाले-‘भेटीबाबत गैर अर्थ काढून बोलू नका’

Shivsena | पोटनिवडणुकीच्या व्यूहरचनेत, कटकारस्थानात अडकलेल्या ’खोके’ सरकारला शेतकर्‍यांची दैना दिसेल काय? शिवसेनेचा सवाल

Pune Crime | कोल्हापूरमधील ‘खूनाच्या बदल्यात खून’ प्रकरणातील कुख्यात ‘डॉक्टर डॉन’चे पुणे कनेक्शन; कुख्यात गज्या मारणे टोळीशी ‘गॅटमॅट’, डॉ. प्रकाश बांदिवडेकरला इंदूरहून अटक

 

Related Posts