IMPIMP

Pune Crime | कोल्हापूरमधील ‘खूनाच्या बदल्यात खून’ प्रकरणातील कुख्यात ‘डॉक्टर डॉन’चे पुणे कनेक्शन; कुख्यात गज्या मारणे टोळीशी ‘गॅटमॅट’, डॉ. प्रकाश बांदिवडेकरला इंदूरहून अटक

by nagesh
Pune Crime | The Pune connection of the infamous 'Doctor Don' in the 'murder for murder' case in Kolhapur; The notorious killing gang 'Gatmat', Dr. Prakash Bandivadekar arrested from Indore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) गाजलेल्या ‘खून का बदला खून’ या बांदिवडेकर घराण्यातील व संबंधित असे एका पाठोपाठ ९ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर (Dr. Prakash Satappa Bandivadekar) याने पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे (Gangster Gajanan Marne) टोळीशी संधान बांधले असल्याचे व पुण्यात आपले जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) नुकसान झाल्याने ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची खंडणी मागून (Extortion Case) व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case)करुन त्याला जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात पुण्याच्या गुन्हे शाखेने डॉ. प्रकाश बांदिवडेकर याला इंदूरमध्ये (Indur Madhya Pradesh) पकडून अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

या व्यावसायिकाचे गज्या मारणे टोळीने अपहरण केल्यानंतर प्रकाश बांदिवडेकर याने फोन करुन त्याला धमकावले होते. याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांचे पथक बांदिवडेकर याचा शोध घेत होते. त्याची चाहूल लागल्यावर तो कोल्हापूरहून पसार झाला होता. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर एक पथक इंदूर येथे पाठविण्यात आले. त्यांनी बांदिवडेकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रकाश बांदिवडेकर याच्यावर १९९८ पासून चंदगड पोलीस ठाण्यात (Chandgad Police Station) ८, बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्यात (Belgaum Market Police Station) ३ आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) एक असे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खून (Murder Case), खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder), खंडणी, अपहरण, फसवणूक (Cheating Case), सरकारी कामात अडथळा यांचा समावेश आहे. १९९८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये डॉ. बांदिवडेकर याला जन्मठेप व १० हजार रुपयांची शिक्षा झाली आहे. तसेच १९९२ व २०१२ मधील गुन्ह्यातून त्याची निर्दाेष सुटका झाली होती. अन्य गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (PSI Bhairavnath Shelke) ,
पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार व ऋषिकेश व्यवहारे यांनी केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | The Pune connection of the infamous ‘Doctor Don’ in the ‘murder for murder’ case in Kolhapur; The notorious killing gang ‘Gatmat’, Dr. Prakash Bandivadekar arrested from Indore

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दांडेकर पुल परिसरात दोन टोळक्यात राडा; 16 जण ताब्यात

Rain in Maharashtra | परतीच्या पावसाचा जोर कायम, पुढील 4 दिवस कशी असेल स्थिती, राज्यातून पाऊस कधी जाणार?, जाणून घ्या

Firing In Islampur | कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करणारा राष्ट्रवादीचा माजी नगरसवेक गजाआड

 

Related Posts