IMPIMP

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

by nagesh
Rupali Chakankar | maharashtra women commission president rupali chakankar facebook post about vat purnima facing offensive comments heramb kulkarni reaction

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनखडकवासला विधानसभा मतदारसंघ (Khadakwasla Assembly Constituency) विधवाप्रथा मुक्त करणार, असा निश्चय राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला आहे. खडकवासला पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ठरणार, असा ठराव रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या नेतृत्वाखाली उद्या मंजूर होणार आहे. पुण्यात एकाच दिवशी तब्बल 29 ग्रामपंचायती विधवा प्रथेविरुद्ध ठराव (Resolution Against the Practice of Widowhood) करणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आज एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी (Scientific) व प्रगतिशील समाज (Progressive Society) म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून आले येते. पतीच्या निधनावेळी पतीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जाते.

 

महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) व महराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) आवाहन केले होते त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल 29 ग्रामपंचायतींनी व 4 प्रभागातील नागरिकांनी गुरुवारी (दि.9) जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे. अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो 100 टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल. मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसुत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा (Shraddha Joshi-Sharma),
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Pune District Collector Rajesh Deshmukh),
मनपा आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar),
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Zilla Parishad CEO Ayush Prasad),
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh) हे उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Rupali Chakankar | 29 gram panchayats to hold resolution against widowhood in Pune on same day; Initiative by Rupali Chakankar

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

Modi Cabinet Decision On MSP | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट ! खरीप पिकासाठीच्या MSP च्या वाढीस मंजुरी

Pankaja Munde | ‘पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’ ! विधानपरिषदेसाठी भाजपने पत्ता कट केल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून आमंत्रण

 

Related Posts