IMPIMP

Rupali Chakankar | बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द करा ! राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra State Women Commission Public hearing from 19th to 21st July under Mhila Aayog Aypa Dari initiative in Pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  कोरोना काळामध्ये राज्यात बालविवाहाचे (Child Marriage) प्रमाण वाढले आहे. राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोग (State Women Commission) सक्रिय झाले आहे. बालविवाह रोखण्यासाठी आयोगाने एक नवीन नियम (New rules) लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना (CM) पत्र लिहिले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी बालविवाह झाल्यास सरपंच (sarpanch), ग्रामसेवक (gramsevak), तलाठ्यांचे (talathi) पद रद्द करा (posts cancel) अशी मागणी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बालविवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमांनुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास येईल.
तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसं की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधीकारी (Marriage Registration Officer), ग्रामसेवक, तलाठी या अधीकाऱ्यांची जाबदारी निश्चित करावी.
यानंतर जर बालविवाह झाले आणि त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करावे.
ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 मध्ये करावी.
अशी शिफारस राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून करत असल्याचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar)
यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मागील दोन वर्षात 914 बालविवाह रोखले

 

राज्यात मागील दोन वर्षात एकूण 914 बालविवाह रोखण्यात आले आहेत.
सर्वाधिक बालविवाहाचे प्रमाण बीड, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, सोलापूर, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांत जास्त आहे.
यातील 81 घटनांमध्ये FIR दाखल करण्यात आले आहेत. मात्र, ही आकडेवारी नोंदवलेली आकडेवारी आहे.
ज्यांची नोंदच झालेली नाही अशी आकडेवारी खूप मोठी आहे.
वयाच्या 14-15 व्या वर्षी बालविवाह केले जातात. त्यानंतर एका वर्षातच मुलीवर बाळंतपण लादले जाते.
अनेक वेळा बाळंतपणामध्ये माता किंवा होणाऱ्या बाळाचा मृत्यू होतो.
याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बालविवाहावर आळा घालणे गरजेचे आहे.

 

कायद्यातील सध्याची तरतूद

 

बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 (Child Marriage Prohibition Act 2006) कायद्यानुसार मुलीचे लग्न लावून देणारे कुटुंब,
भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय मालक यांच्यावर कारवाई करण्यात येते. आता यामध्ये सुधारणा करुन नवीन नियमांची भर टाकली जाणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Rupali Chakankar | in case of child marriage cancel the posts of sarpanch gramsevak talathi Rupali Chakankar State Women Commission

 

हे देखील वाचा :

RBI ATM Rules | तुम्ही सुद्धा मृत कुटुंबियाच्या खात्यातून किंवा ATM मधून पैसे काढत आहात का? मग जाणून घ्या परिणाम

Aurangabad Crime | बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं 20 लाखांचा घातला गंडा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

 

Related Posts