IMPIMP

RBI ATM Rules | तुम्ही सुद्धा मृत कुटुंबियाच्या खात्यातून किंवा ATM मधून पैसे काढत आहात का? मग जाणून घ्या परिणाम

by nagesh
Pune Crime | A 76-year-old man was duped on the pretext of helping him withdraw money from an ATM in Kothrud

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRBI ATM Rules | कुटुंबातील एखाद्या सदस्याचा जर मृत्यू झाला तर या दु:खातून सावरण्यासाठी खुप वेळ जातो. परंतु हे दु:ख सहन करत काही कामे करावीच लागतात. बँकेसंबंधीत कामांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. जसे की, कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याचे बँक अकाऊंट (Bank Account) लवकरात लवकर बंद केले पाहिजे. मृत व्यक्तीचे खाते आणि ATM Card यांचे काय करावे? RBI चे नियम (RBI ATM Rules) काय आहेत ते जाणून घेवूयात…

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अलिकडेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढले.
पतीने पत्नीच्या मृत्यूसंबंधी आवश्यक कागदपत्रांपासून वाचण्यासाठी ही पद्धत वापरली.
परंतु पतीची ही हुशारी त्याला महागात पडली. बँकेने पतीविरूद्ध कायदेशीर कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल केला.

 

यावरून स्पष्ट होते की, कोणत्याही मृत व्यक्तीच्या खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढणे बेकायदेशीर आहे.
जरी पैसे काढणारी व्यक्ती मृताचा नॉमिनी असेल तरी सुद्धा.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची मालमत्ता किंवा पैसे नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर होण्याची एक कायदेशीर प्रक्रिया (RBI ATM Rules) आहे.

 

काय सांगतो नियम ?

 

कायदा सांगतो की, अशाप्रकारची प्रकरणे बँक आणि इतर कायदेशीर वारसांना फसवण्यासारखे आहे.
अशा स्थितीत पोलीस तक्रार दाखल होऊ शकते. या आरोपाखाली दंड होऊ शकतो.
जर मृताने आपल्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी नोंदले असतील आणि त्यांच्यापैकी एखादी व्यक्ती त्या पैशाचा वापर करत असेल तर तिला नॉमिनीकडून सहमती घेऊन बँकेत दाखल केली पाहिजे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या गोष्टी लक्षात ठेवा

 

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर हे जाणून घ्या की, मृताचे बँक अकाऊंट संयुक्त होते किंवा एकट्याचे होते.
यानंतर नॉमिनीचे नाव नोंदले होते किंवा नाही ते जाणून घ्या.
जर एखाद्या बँक अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर त्याच्यानंतर त्याचे कुटुंबिय बँक खात्यातील रक्कमेवर आपला दावा (RBI ATM Rules) करू शकतात.

 

बँक खाते बंद करायचे असेल तर काय करावे?

 

जर बँक खाते (Bank Account) बंद करायचे असेल तर मृत व्यक्तीचे नोटराईज्ड डेथ सर्टिफिकेट द्यावे लागेल.
जर कुणी नॉमिनी असेल तर त्याला सहज सर्व पैसे मिळतील, जे तो वारसांकडे सोपवेल.
पण नॉमिनी नसेल तर कुटुंबातील सदस्य जो वारस असेल तो डेथ सर्टिफिकेटसह बँकेत आपले आणि मृत व्यक्तीच्या नात्याशी संबंधीत कागदपत्रे सादर करेल.
बँक इंडेमनिटी बाँडची सुद्धा मागणी करू शकते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काय आहेत RBI चे निर्देश?

 

आरबीआय (Reserve bank) ने बँकांना अशा प्रकरणांत नरमाईचे धोरण ठेवण्यास सांगितले आहे.
कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर ही माहिती बँकेला देण्यासाठी कलावधी ठरलेला नाही.
पीडित जेव्हा सुद्धा मानसिक प्रकारे तयार होईल तेव्हा हे काम करू शकता.
आरबीआयच्या निर्देशानुसार कुटुंबातील सदस्यांनी पैसे काढण्यासाठी अर्ज दिला तर बँकेला हे काम 15 दिवसात पूर्ण करावे लागेल.

 

Web Title : RBI ATM Rules | are you withdrawing money from the deceased person bank account or atm check rules

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं 20 लाखांचा घातला गंडा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी न्यायालयात केली ‘ही’ विनंती, म्हणाले…

 

Related Posts