IMPIMP

Rutuja Latke | राजीनामा मंजूर झाल्यानंतर ऋतुजा लटके म्हणाल्या…

by nagesh
Andheri By Election | mumbai andheri east vidhansabha bypoll shivsena uddhav thackeray rutuja latke victory bjp muraji patel withdraws candidature

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पूर्व येथे विधानसभेच्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Uddhav Balasaheb Thackeray) मार्ग मोकळा झाला. गेले दोन दिवस त्यांच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या महापालिकेतील नोकरीच्या राजीनाम्याचे प्रकरण गाजत होते. त्यातून त्यांची सुटका झाली आहे. महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या कार्यवाहीस 30 दिवसांचा कालावधी दिला होता. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray Group) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. गुरुवारी या याचिकेवर न्यायालयात सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश आयुक्तांना दिले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी आयुक्तांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा (Resign) मंजूर करुन घेतल्याचे पत्र दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला आयुक्तांनी राजीनामा मंजूर केल्याचे पत्र दिले, त्यामुळे मला आनंद आहे. आता माझा आणि माझ्या पक्षाचा ही निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मला स्त्री म्हणून संघर्ष करणे हे प्राप्त आहेच आणि या प्रकरणात देखील मला संघर्ष करावा लागला आहे, असे मत ऋतुजा लटके यांनी दिले. हा संघर्ष ही केवळ सुरुवात होती. येणाऱ्या काळात मला यापेक्षा जास्त संघर्ष करावा लागणार आहे. आणि यापुढे देखील न्यायासाठी मी संघर्ष करायला तयार आहे.
महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) मला पाठिंबा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी जिंकणार असल्याचे ऋतुजा लटके (Rutuja Latke) म्हणाल्या.

 

या निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी मुरजी पटेल यांच्याविषयी देखील त्यांनी भाष्य केले.
लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते देखील अर्ज भरु शकतात.
मशाल चिन्हावर (Mashal Symbol) शिवसेनेने यापूर्वी देखील निवडणुका लढविल्या आहेत.
त्यामुळे ही निवडणूक आम्ही मशाल चिन्हावर लढून जिंकणार आहोत.

 

 

Web Title :-  Rutuja Latke | After the resignation was accepted, Rituja Latke said…

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक- 2 नं कोल्हापूरच्या ‘डॉक्टर डॉन’ला इंदूरमधून घेतले ताब्यात; गज्या मारणेसह खंडणी प्रकरणात सहभाग निष्पन्न

Girish Mahajan | मला जाणून बुजून लक्ष्य केले गेले; व्हायरल ऑडिओ क्लीपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal | भुजबळांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंविरोधात दाखल केलेल्या खटल्याचा किस्सा, म्हणाले – न्यायाधीशांना म्हणालो…

 

Related Posts