IMPIMP

Chhagan Bhujbal | भुजबळांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंविरोधात दाखल केलेल्या खटल्याचा किस्सा, म्हणाले – न्यायाधीशांना म्हणालो…

by nagesh
Chhagan Bhujbal | 'Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra will change the country' - Chhagan Bhujbal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वाढदिवसानिमित्त आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात (Shanmukhananda Auditorium) अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Party Chief Balasaheb Thackeray) यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसान खटल्याचा एक किस्सा सांगितला. शेवटी जिंकत आलेला हा खटला न्यायाधीशांना हात जोडून विनंती करत मागे कसा घेतला हे देखील त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, रमाबाई नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्याची विटंबना झाली. आंदोलन झाले, त्यावर गोळीबार (Firing) झाला आणि 11 लहान-मोठी माणसे मारली गेली. मी विधानसभेत येऊन सांगितले की, हे सरकार खुनी आहे. यांनी लोकांचे खून केले. दुसर्‍या दिवशी माझ्या घरावर हल्ला झाला. राजू जैन (Raju Jain) म्हणून एका व्यक्तीने तर मला छगन भुजबळ यांनी विटंबना कर म्हणून सांगितले आणि मी नाही सांगितले म्हणून त्यांनी दुसर्‍याकडून विटंबना करून घेतली, असे प्रतिज्ञापत्र दिले.

 

सामनात छापून आले, हाच तो नराधम, यानेच विटंबना केली. मी म्हटले, मी काहीच केले नाही. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुंडेवार (High Court Judge Gundewar) यांच्या आयोगाची नेमणूक झाली. त्यांनी मलाही बोलावले. चौकशीत लक्षात आले की प्रतिज्ञापत्र देणारा व्यक्ती जेव्हा माझ्याकडे आला असे सांगत होता, तेव्हा मी कांदिवलीत झोपड्या तोडू नये म्हणून मोर्चात होतो. त्याने ज्या हॉटेलमध्ये राहिल्याचे सांगितले त्या हॉटेलमध्ये तो व्यक्ती राहिलाच नव्हता. ज्या बसने गेला सांगितले ती बसच तिकडे गेलीच नव्हती. यानंतर गुंडेवार आयोगाने मला क्लीन चिट दिली.

 

 

छगन भुजबळ म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. कारण एकीकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्लीन चिट, तर दुसरीकडे सामनाचे ‘हाच तो नराधम’ या मथळ्याखालील वृत्त होते. त्यात प्रश्नचिन्ह नव्हते. खटला सुरू झाला. सांगण्यासारखे काहीच नव्हते, आरोप आणि क्लीन चिट अशा सर्व गोष्टी सर्वांसमोर होत्या. काही महिन्यांनी सुभाष देसाई (Subhash Desai), संजय राऊत (Sanjay Raut) आले आणि एक चिट्ठी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी त्यांना विचारले काय काम आहे? ते म्हटले बाळासाहेबांचे वय झालेय, आजारीही असतात. माझ्या लक्षात आले. मी म्हटले थांबा, आता काहीच बोलू नका. काय करायचे हे मला कळलेय. केस कधी आहे ते सांगा. त्यांनी तारीख सांगितली. मी त्या दिवशी न्यायालयात गेलो. मी न्यायाधीशांना विनंती केली की मला केस मागे घ्यायची आहे. पाच मिनिटे ते ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणाले केस पूर्ण झाली. केसचा काय निकाल आहे हे तुम्हाला कळते का? तुम्ही काय करता.

 

भुजबळांनी पुढे सांगितले की, मी म्हटले मी तुमचे अगदी पाय धरतो, मला केस मागे घ्यायची आहे.
केस मागे घेतली. मग इतरांचे काय? सुभाष देसाई विश्वस्त आहेत. त्यांच्या विरोधातील केसही मागे घेतली.
तेव्हा उद्धव ठाकरे तेथेच पाठीमागे होते. त्यांनी सांगितले बाळासाहेबांनी तुम्हाला चहाला बोलावले आहे.
मी सांगितले नंतर येतो. आठ दिवसांनी बाळासाहेबांनी मला फोन केला आणि पूर्ण कुटुंबाला घेऊन मातोश्रीवर यायला सांगितले.

 

नंतर मी, समीर, पंकज, त्यांच्या मुली असे सगळे मातोश्रीवर गेलो. तीन-चार तास चर्चा झाली.
चहा, नाश्ता, जेवण झाले. जणुकाय आमच्या आयुष्यात काही घडलेच नाही.
ते भांडण झालेच नाही, अशी आठवण भुजबळ यांनी सांगितली.

 

 

Web Title :-  Chhagan Bhujbal | chhagan bhujbal recall incident when he filed defamation case against balasaheb thackeray

 

हे देखील वाचा :

Sourav Ganguly | बीसीसीआयचे अध्यक्षपद जाणार असल्याने सौरव गांगुलीचा संताप, विरोधकांना दिला इशारा

Deepak Kesarkar | आम्ही लटके यांचा राजीनामा रोखून ठेवा असे आदेश दिले नाहीत, दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेतून सेनेवर आगपाखड

Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ

Related Posts