IMPIMP

Salt Intake | डाएटमध्ये कमी कराल मीठाचे सेवन तर शरीराला होतील हे 7 फायदे!

by nagesh
Salt Intake | 7 health benefits of reducing salt intake in your diet

सरकारसत्ता ऑनलाइन – जेव्हा एखाद्याला हायपरटेन्शनचा त्रास सुरू होतो तेव्हा सर्वप्रथम मीठाचे सेवन (Salt Intake) कमी करण्यास सांगितले जाते. 2015 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, आहारात मिठाचे जास्त सेवन केल्यामुळे, जगातील लोकसंख्येच्या सुमारे 30% लोकांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्येमध्ये (High Blood Pressure Problem) प्रचंड वाढ झाली आहे. यामुळेच ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना मीठाचे प्रमाण (Salt Level) कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो (Salt Intake).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यामुळे ज्यांना हायपरटेन्शन आणि डायबिटीजचा (Hypertension And Diabetes) त्रास आहे, त्यांनी घरातील जेवणात मीठ कमी वापरावे. परंतु लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जास्त मीठ खाणे (Salt Intake) केवळ हृदय आणि मूत्रपिंडांसाठी धोकादायक नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी देखील धोकादायक (Eating Too Much Salt Is Dangerous To Health) ठरू शकते. कमी मीठ का खावे याची 7 कारणे जाणून घेवूयात (Here Are 7 Reasons Why Should Eat Less Salt)…

 

1. रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood Pressure Remains Under Control)

अनेक संशोधनांनुसार सिद्ध झाले आहे की, आहारात सोडियमचे (Sodium) जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि यामुळे धमन्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे (Arteries, Heart And Blood Vessels) दीर्घकाळ नुकसान होऊ शकते. आहारात मीठ कमी ठेवल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच हृदयाचे आरोग्यही सुधारते. याशिवाय असे दिसून आले आहे की जे लोक आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवतात, ते जास्त काळ जगतात.

 

2. हृदयविकार टाळता येतो (Heart Disease Can Be Prevented)

कमी मीठ खाल्ल्याने रक्तदाब बरोबर राहतो, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक (Heart Attack, Stroke) आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, असे आढळून आले की प्रीहायपरटेन्शन (Prehypertension) असलेल्या लोकांमध्ये जे लोक आहारात सोडियमचे कमी सेवन करतात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका 25-30% कमी असतो. याशिवाय मीठ कमी खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यास मदत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. पोट फुगण्याची समस्या होत नाही (Stomach Problems Do Not Occur)

तुम्ही जेवणात जितके कमी मीठ वापरता तितके ते तुमच्या पचनसंस्थेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी चांगले असते. कारण जास्त मीठ खाल्ल्याने पेशींमध्ये पाणी टिकून राहते. यामुळे पोट तर फुगतेच पण चेहराही सूजल्यासारखा वाटतो. चेहर्‍यावर सूज आणि सतत पोट फुगणे टाळायचे असेल तर मिठाचे सेवन कमी करा.

 

4. कर्करोगाचा धोकाही कमी होतो (Also Reduces The Risk Of Cancer)

होय, संशोधनात असे दिसून आले आहे की आहारात मीठ जास्त प्रमाणात घेतल्यास कोलन कॅन्सरचा धोका वाढतो. मिठाच्या अतिसेवनाने पोटाच्या आतील आवरणाला इजा होऊ शकते. त्याच अभ्यासात असेही दिसून आले आहे की कमी मिठाचा आहार संपूर्ण आरोग्य देखील सुधारू शकतो.

 

5. हाडांचे आरोग्य सुधारते (Improves Bone Health)

कॅल्शियम आपल्या शरीरातून लघवीद्वारे काढून टाकले जाते. किती कॅल्शियम सोडले जाईल हे आपल्या शरीरातील सोडियमच्या प्रमाणावर अवलंबून असते. आहारात मीठ जास्त प्रमाणात घेतल्यास लघवीतून जास्त प्रमाणात कॅल्शियम बाहेर पडते. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारखा हाडांशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

 

6. किडनीचे कार्य सुधारते (Improves Kidney Function)

जे लोक जास्त मीठ खातात, त्यांच्या किडनीला शरीरातून मीठ काढून टाकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे लघवीद्वारे जास्त कॅल्शियमही बाहेर काढले जाते. यामुळे किडनी स्टोन आणि किडनीचे इतर आजार होऊ शकतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

7. मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देते (Promotes Brain Health)

मिठाच्या अतिसेवनामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. मेंदूला रक्त वाहून नेणार्‍या धमन्या ब्लॉक किंवा अरुंद होतात,
ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. याव्यतिरिक्त, ते ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि रक्तदाब देखील वाढवते,
ज्यामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो.

 

WHO देखील निरोगी राहण्यासाठी दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाण्याची शिफारस करते.
विशेषतः जर तुम्ही उच्च रक्तदाब आणि जुनाट आजाराने ग्रस्त असाल.
एक लहान चमचा मीठ सुमारे 6 ग्रॅम इतके असते. त्यामुळे तुम्ही दिवसभरात किती मीठ खात आहात ते लक्षात ठेवा.
त्यात ब्रेड, केचप, चिप्स आणि चीजमधील मीठाचा देखील समावेश आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Salt Intake | 7 health benefits of reducing salt intake in your diet

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar on Navneet Rana | ‘…हे तपासण्याचं अजुन तरी आपल्याकडे यंत्र नाही’; अजित पवारांचा नवनीत राणांना टोला !

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो

Nose Bleeding Problem | उन्हाळ्यात वाढू शकते नाकातून रक्त येण्याची समस्या, ‘या’ 3 सोप्या पद्धतीने करा बचाव

 

Related Posts