IMPIMP

Nose Bleeding Problem | उन्हाळ्यात वाढू शकते नाकातून रक्त येण्याची समस्या, ‘या’ 3 सोप्या पद्धतीने करा बचाव

by nagesh
Nose Bleeding Problem | how to deal with nose bleeding problem during hot weather

सरकारसत्ता ऑनलाइन – Nose Bleeding Problem | उन्हाळ्याचे आगमन होताच आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना (Health Problem) सुरुवात होते. या ऋतूमध्ये लोकांना उष्माघात, डिहायड्रेशन आणि नाकातून रक्त येणे (Heatstroke, Dehydration And Nose Bleeding ) अशा अनेक समस्या उद्भवू लागतात. काहींना गरम पदार्थ खाल्ल्यानंतर हा त्रास होऊ लागतो. नाकातून पुन्हा पुन्हा रक्त येणे (Nosebleeds) चांगले नाही. याची कारणे आणि बचावाची पद्धत जाणून घेवूया (Nose Bleeding Problem)…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाकातून रक्त येण्याची कारणे (Causes Of Nosebleeds)

1. कोरडी हवा (Dry Air)

नाकातून रक्तस्त्राव होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरडी हवा. उष्णतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात. नाक कोरडे होऊ नये म्हणून हायड्रेटेड राहणे आणि भरपूर द्रव पिणे आवश्यक आहे (Nose Bleeding Problem).

 

2. सायनस (Sinus)

साईनसायटिस ही सायनसची सूज आहे, ज्यामुळे नाकाच्या पडद्यामध्ये कोरडेपणा येतो आणि नाकातून रक्तस्त्राव होतो. व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या (Viral or Bacteria) संसर्गामुळे ही समस्या उद्भवते.

 

3. सर्दी (Cold)

नाकातून रक्त येण्याच्या अनेक कारणांपैकी सर्दी हे देखील एक कारण आहे. सर्दीमुळे नाकाच्या आतील भागात जळजळ होऊन नाकातून रक्तस्त्राव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

 

नाकातून रक्तस्त्रावाची समस्या सामान्यतः अति उष्णतेच्या संपर्कात राहणे, मसालेदार किंवा तिखट मिरचीचे पदार्थ खाणे, नाकाला दुखापत होणे आणि सर्दी वाढणे यामुळे होते. चक्कर येणे, बेशुद्धी किंवा डोके जड होणे हे सामान्य आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे (How To Protect Yourself From Heat)

1. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळा. घरातून बाहेर पडताना स्कार्फने डोके झाका किंवा छत्री वापरा.
2. उन्हाळ्यात शरीरात सहज पाण्याची कमतरता होते, त्यामुळे भरपूर पाणी प्या जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.
3. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या. अधिक फळे आणि हिरव्या भाज्या खा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Nose Bleeding Problem | how to deal with nose bleeding problem during hot weather

 

हे देखील वाचा :

Forest Guard Swati Agham Yavatmal | कौतुकास्पद ! लेडी सिंघमचं पशुप्रेम पाहून तुम्हालाही करावसं वाटेल कौतुक

Dementia Early Signs | काय आहे डिमेंशिया, जाणून घ्या ‘या’ आजाराच्या 6 सुरुवातीची लक्षणांबाबत

Sanjay Raut | ‘वाह रे वा यांचं परिवर्तन… योगी… भोगी ?’ – संजय राऊत

 

Related Posts