IMPIMP

Sanjay Biyani Murder Case | नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात NIA ला मोठे यश, प्रमुख शूटरला नेपाळ बॉर्डरवरुन अटक

by nagesh
Sanjay Biyani Murder Case | NIA's big success in Sanjay Biyani murder case of famous construction businessman in Nanded, main shooter arrested from Nepal border

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाईन   नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या (Sanjay Biyani Murder Case) करण्यात आली होती. संजय बियाणी हत्याकांड प्रकरणी (Sanjay Biyani Murder Case) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (National Investigation Agency) पथकाला मोठे यश आले आहे. या प्रकरणाती मुख्य शूटर दीपक रांगा (Deepak Ranga) याला एनआयएच्या (NIA) पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन (Nepal Board) बुधवारी (दि.25) अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

गेल्या वर्षी 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये दीपक रांगा याने बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. रांगा हाच मुख्य शूटर असल्याची माहिती नांदेड पोलीस (Nanded Police) दलातील सूत्रांनी दिली. दीपक रांगा हा अनेक देशविघातक गुन्ह्यातील आरोपी आहे. कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा (Terrorist Harvinder Singh Rinda) याच्या सांगण्यावरुन खंडणीसाठी (Extortion) संजय बियाणी यांची हत्या केली होती.

संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात (Sanjay Biyani Murder Case) नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने 15 जणांना अटक (Arrest) केली आहे. तर एका अल्पवयीन शूटरला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. आता दुसऱ्या शूटरला अटक करण्यात आली असून दीप रांगा याच्या ओळख परेडसाठी नांदेड पोलिसांचे एक पथक पंजाबमध्ये दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय बियाणी हत्याकांडात कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रींदा याचा सहभाग असल्याने, आणि दोन शूटर दहशतवादी गुन्ह्यात सहभागी असल्याने या प्रकरणाचा तपास देखील एनआयएकडे जाण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी (Special Investigation Team (SIT) करत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Sanjay Biyani Murder Case | NIA’s big success in Sanjay Biyani murder case of famous construction businessman in Nanded, main shooter arrested from Nepal border

 

हे देखील वाचा :

Pathaan | … आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, ‘पठाण’ चित्रपटावरून मनसेचा हल्लाबोल

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मंत्री दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला, म्हणाले – ‘शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय दुसरे ते…’

Gold-Silver Rate Today | प्रजासत्ताक दिनी सोन्या-चांदीला झळाळी, सोन्याचा दर 57 हजारांच्याही पुढे

 

Related Posts