IMPIMP

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

by nagesh
 Sanjay Gaikwad | sanjay raut would trampled by balasaheb thackeray sanjay gaikwad statement viral video

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – Sanjay Gaikwad – आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांची ९७ वी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ठाकरे गटाकडून बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. ज्यात बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत की, ‘जर शिवसेनेचा एक जरी आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा.’ त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटावर टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, जर बाळासाहेब ठाकरे आता जिवंत असते तर काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत युती करणाऱ्या राऊतांसह इतर सगळ्या नेत्यांना पायाखाली तुडवलं असतं. अशी टीका त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊतांसह (Sanjay Raut) शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांवर केली आहे.

 

 

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांना एका वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीने बाळासाहेब ठाकरे यांच्या
‘त्या’ वक्तव्याबाबत विचारले असता, संजय गायकवाड म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे हयात असताना
१९९०-९१ च्या आसपास शिवसेनेचे काही आमदार फुटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी ते आवाहन केलं होतं.
आम्हीही शिवसैनिक म्हणून मोर्चे काढले होते. पण त्यावेळी जे आमदार फुटले होते,
ते हिंदुत्वाशी गद्दारी करून फुटले होते. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी ‘त्यांना तुडवा’ असं सांगितलं होतं.
आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करून नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन बाहेर पडलो आहोत.
आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या या राऊतासह
सगळ्यांना पायाखाली तुडवलं असतं.’ असं विधान यावेळी बोलताना संजय गायकवाड यांनी केले.

 

दरम्यान, औरंगाबाद येथे बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी
गद्दारांना बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा काही अधिकार नाही. असे वक्तव्य केले होते.
त्यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी
आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Gaikwad | sanjay raut would trampled by balasaheb thackeray sanjay gaikwad statement viral video

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | राज्यपालांचा राजीनामा म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण; अमोल मिटकरींची खोचक टीका

Rutuja Sawant | रुबीना दिलैक पेक्षाही बिकनी फोटोमध्ये ‘ही’ अभिनेत्री दिसते एकदम हॉट

Hansika Motwani | अभिनेत्री हंसिका मोटवानीने ॲब्ज दाखवत शेअर केले फोटोज

 

Related Posts