IMPIMP

Sanjay Gaikwad | ‘50 खोक्यांची चौकशी करा’ या राऊतांच्या मागणीला संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर

by nagesh
Sanjay Raut | sanjay gaikwad replied to sanjay raut statement on cm eknath shinde speech in vidhansabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sanjay Gaikwad | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना फोडण्यासाठी शिवसेनेतील 40 आमदारांना 50 कोटी दिले गेले होते, असा दावा केला. तसेच हा व्यवहार कसा काय झाला, याची एसआयटी चौकशी व्हावी. त्यामुळे या सर्वांची एसआयटी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यावर शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी राऊतांना उत्तर दिले आहे. संजय राऊतांच्या वात्रट तोंडाला कंटाळून आमदारांनी उठाव केला असे गायकवाड म्हणाले.

 

शिवसेनेतील 40 आमदार खोके घेऊन फुटले नाहीत, तर संजय राऊतांचे वात्रट तोंड, त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमता, घरातून चालणारे सरकार, मातोश्री, वर्षाचे दरवाजे बंद याला कंटाळून त्यांनी उठाव केला, असेही गायकवाड म्हणाले. 11 कॅबिनेट मंत्री सत्तेवर लाथ घालून जातात, तर याला फुटला, गद्दार काय म्हणायचे. मंत्रीपदासाठी लोक हजारो, कोटी रुपये देण्यास तयार असतात. ते सोडून 50 खोक्यांसाठी जाणार म्हणता, आता संजय राऊतांना तेवढी तरी अक्कल पाहिजे, अशी टीका गायकवाडांनी केली. आमदार म्हणून आम्ही जनतेसमोर कोणते तोंड घेऊन जाणार होतो? तुम्ही मंदिरे बंद करून टाकलीत. यात्रा, निवडणुका सर्व काही बंद केले. हा पाकिस्तान आहे की हिंदुस्थान? त्यामुळेच सर्व आमदारांनी उठाव केला, असे गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

केंद्र सरकारने रेशनची नवीन योजना जाहीर केली आहे. गरिबांना रेशन देण्यासंदर्भात त्यांनी योजना आणली आहे.
त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील एसआयटीचे रेशन सुरू केले आहे. मागेल त्याला एसआयटी दिली जात आहे.
महाराष्ट्रातून शिवसेनेचे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता,
त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. पण जे विषय पोलीस, सीबीआयने संपवले आहेत,
त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात.
आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत आणि त्यात तुम्हीच तोंडावर पडाल, असे संजय राऊत म्हणाले होते.

 

Web Title :- Sanjay Gaikwad | shinde faction mla sanjay gaikwad on shivsena sanjay raut allegations over 50 crores

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसिथसाठी खर्च केले 20 लाख; कोण आहे अब्दुल बसिथ?

 

Related Posts