IMPIMP

IPL 2023 | राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसिथसाठी खर्च केले 20 लाख; कोण आहे अब्दुल बसिथ?

by nagesh
IPL 2023 | ipl auction 2023 abdul basith the son of a bus driver has been roped in by the rajasthan royals team

सरकारसत्ता ऑनलाईन  – नुकताच काल आयपीएल 2023 (IPL 2023) चा मिनी-लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंची चांदी झाली आहे. या लिलावात सॅम करन, कॅमरुन ग्रीन, निकलोस पुरन, बेन स्टोक्स हे खेळाडू सर्वात महागडे ठरले. या लिलावात अश्या काही खेळाडूंना खरेदी करण्यात आले आहे की, ज्यांचे नाव आपण ऐकले नसेल. या खेळाडूंपैकी एक म्हणजे अब्दुल बसिथ. या खेळाडूवर 20 लाखांची बोली लावून राजस्थानने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्यामुळे आता अब्दुल बसिथ संघाचा कर्णधार संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसणार आहे. (IPL 2023)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोण आहे अब्दुल बसिथ
अष्टपैलू अब्दुल बसिथ हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघाकडून खेळतो.
त्याचे वडील केरळ परिवहन महामंडळामध्ये बसचालक आहेत.
त्याने एर्नाकुलम या लहानशा गावातून अब्दुलने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती.
जेव्हा अब्दुलला आरआर संघाने 20 लाख रुपयांत खरेदी केले, तेव्हा त्याचे आई-वडील टी.व्ही.समोर बसून होते.
त्यावेळी तो बाहेर गेला होता. त्यानंतर त्यामुळे, वडिलांनी अब्दुल घरात येण्यापूर्वीच केक आणून ठेवला होता.
अब्दुल घरी येताच त्याचे स्वागत करुन केक कापण्यात आला. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन देखील केरळचा खेळाडू आहे. (IPL 2023)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजस्थानच्या संघाने या लिलावात विकत घेतलेले खेळाडू
राजस्थानच्या संघाने या लिलावात जो रूट (1 कोटी), अब्दुल बासिथ (20 लाख), आकाश वशिष्ठ (20 लाख),
एम अश्विन (20 लाख), केएम आसिफ (30 लाख), अ‍ॅडम झाम्पा (30 लाख), कुणाल राठौर (20 लाख),
डोनोवन फरेरा (20 लाख) आणि जेसन होल्डर (5.75 कोटी) या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामावून घेतले आहे.

 

Web Title :- IPL 2023 | ipl auction 2023 abdul basith the son of a bus driver has been roped in by the rajasthan royals team

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी राज्यात आतंकवाद फोफावण्यास पोषक वातावरण निर्माण केले – भाजप

Aurangabad Crime | पत्नीच्या गर्भपातासाठी पतीचे धक्कादायक कृत्य; फुलंब्री मधील प्रकार

Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात; वडील भगवान गोरे यांच्या विधानाने खळबळ

 

Related Posts