IMPIMP

Sanjay Raut | गोव्यातील रश्मी शुक्ला कोण ? खा. संजय राऊत यांचे भाजपवर जोरदार शिरसंधान

by nagesh
MP Sanjay Raut | thackeray group leader sanjay rauts reaction on the disagreement in mahavikas aghadi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनSanjay Raut | दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्याच्या वेळी भाजपने (BJP) पोलीस अधिकार्‍यांना हाताशी धरुन आमदारांचे फोन टॅपिंग (MLA Phone Tapping) केले होते, तोच प्रकार आता गोव्यात (Goa) सुरु असून गोव्यातील रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) कोण आहेत, असा सवाल उपस्थित करीत खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) भाजपवर शिरसंधान केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोव्यातील मतदान पार पडले आहे. आता १० मार्च रोजी निकाल लागेल. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तेथील नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी कालच आपला फोन टॅप (Phone Tapping in Goa) केला जात असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा देशभरात गैरवापर सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून माझाही फोन टॅप केला जात आहे. मात्र, मी त्यांना घाबरणारा नाही़ मी माझा फोन बदलला नाही.

 

 

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या विरोधकाना संपविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमली पदार्थ विक्री व्यवसायातील गुन्हेगार असल्याचे सांगून बेकायदेशीरपणे व राजकीय हेतूने पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे ६० दिवस टेलिफोन टॅपिंग केले होते.
त्यावरुन तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey)
यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court)
धाव घेतली असून त्यांच्यावर २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचा आदेश न्यायालयाने (Bombay High Court) दिला आहे.

 

मागील निवडणुकीत गोव्यात काँग्रेस पक्ष (Goa Congress) सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता.
मात्र, भाजपने (Goa BJP) फोडाफोडी करुन रात्रीतून सत्ता मिळविली होती.
त्यामुळे यावेळीही भाजप अशा प्रकारे फोडाफोडी करण्यासाठी संभाव्य निवडून येणार्‍या आमदारांचे फोन टॅपिंग करीत असल्याचे आरोप होत आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut tweet phone tapping of digambar kamat is going on in goa

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | धक्कादायक ! फेसबुकवर 56 वर्षाच्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनाम; तिच्या दुसर्‍या पतीनं पाठविले जावयाला अश्लिल फोटो

Pune Crime | दौंड तालुक्यातील राहु येथील टोळक्याकडून मोठा शस्त्र साठा जप्त ! मित्रमैत्रिणींवर शायनिंग मारण्यासाठी केला भलताच ‘उद्योग’

Pune Crime | वन खात्याची जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले MPDA कायद्याखाली स्थानबद्ध

 

Related Posts