IMPIMP

Santosh Bangar | प्राचार्यांना मारहाण करणाऱ्या शिंदे गटातील आमदाराचे प्राचार्यांवर गंभीर आरोप; म्हणाले…

by nagesh
Santosh Bangar | shinde group mla santosh banger clearification hingoli iti principal beat case

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाईन   Santosh Bangar | शिवसेना पक्षातील फूटीनंतर शिंदे गटात सामील झालेल्या कळमनुरीच्या आमदारांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका कॉलेजमधील प्राचार्याला मारहाण करत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावरून संतोष बांगर यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्राप्त माहितीनुसार, ही घटना मागील आठवड्यात घडली आहे. हिंगोली येथील तंत्रनिकेतनमध्ये कार्यालयात जावून प्राचार्यांना संतोष बांगर यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. यावर आता संतोष बांगर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

यावेळी बोलताना संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणाले की, ‘याप्रकरणात माध्यमांनी प्राचार्य आणि उपप्राचार्यांना जाब विचारला आहे का? त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर, मी निश्चित कुठंतरी चुकलेलो असावं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत आहे. येथे कोणी महिलेवर अत्याचार करत असेल, तर सहन करणार नाही. मग गुन्हा दाखल झाला तरी पर्वा नाही.’ असं यावेळी बोलताना संतोष बांगर म्हणाले.

 

तर याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सरकारमध्ये असल्याने आवाज उठवायचा नाही का? ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण नाही आहे.
संपूर्ण प्रकरणाची उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. ज्या महिलेवर अन्याय होत होता,
तिचा व्हिडीओही माझ्याजवळ आहे. मारहाण झाल्यावर प्राचार्यांनी तक्रार का केली नाही?’
याविषयीचा सवाल देखील यावेळी बोलताना संतोष बांगर यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Santosh Bangar | shinde group mla santosh banger clearification hingoli iti principal beat case

 

हे देखील वाचा :

Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

 

Related Posts