IMPIMP

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

by nagesh
Nilesh Rane On Aaditya Thackeray | bjp leader nilesh rane mocks aaditya thackeray group on davos visit cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Nilesh Rane On Aaditya Thackeray | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस
दौरा गाजत असून त्यात करण्यात आलेले करार, त्याबाबतचे आकडे यांच्यावर विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री नक्की
किती तास दावोसमध्ये होते? यावरून आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या सर्व मुद्यांवरून सध्या राज्यातील राजकारण तापलेले असतानाच
भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यावरून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टीका (Nilesh Rane On Aaditya Thackeray) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर सुरूवातीपासूनच विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) दावोसला रवाना होण्याअगोदर, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यामध्ये जवळपास १ लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. यातील आकड्यावरून वाद सुरू असतानाच यातले काही करार महाराष्ट्रात अगोदरच असलेल्या कंपन्यांसोबत करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे खरचं मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा यशस्वी झाला का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच विरोधकांचे आरोप फेटाळून लावताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचे ते विधान चांगलेच चर्चेत आले.

 

दीपक केसरकर यांनी यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत विरोधकांचे आरोप फेटाळून लावत म्हटले होते की,
‘डाव्होस दौऱ्यात हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, अशा वेळी मुख्यमंत्र्यांचं डाव्होसमध्ये
अनुपस्थित राहणं योग्य नव्हतं. हा पंतप्रधान मोदींचा (PM Narendra Modi) अपमान ठरला असता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि यावेळी ते केवळ चार तास झोपले.
७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले.’
यावर त्यांच्या वक्तव्यात आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या वक्तव्यात तफावत दिसून आली होती. (Nilesh Rane On Aaditya Thackeray)

 

 

दरम्यान, सुरूवातीपासूनच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करत आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपनेते
निलेश राणे यांनी कडक शब्दात सुनावले आहे. त्यासंबंधीचे ट्वीट निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले आहे.
ज्यात त्यांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे.
निलेश राणे लिहितात, ‘आदित्य ठाकरेंनी जाहीर करावं की मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर त्यांनी लंडनमध्ये
१० दिवस घालवले की नाही? लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी कुठलं शासकीय काम हाताळलं?’
असा सवाल निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nilesh Rane On Aaditya Thackeray | bjp leader nilesh rane mocks aaditya thackeray group on davos visit cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Chinchwad Bypoll | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत कोण असणार भाजपचा संभाव्य उमेदवार?; याबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत

Ambadas Danve | ‘सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी जर विजयाचा जल्लोष करत असतील, तर शंकेला वाव,’ ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला सवाल

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी, इव्हानो इलेव्हन संघांची विजयाची हॅट्रीक !!

 

Related Posts