IMPIMP

Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

by nagesh
Santosh Juvekar | Santosh Juvekar's Big Reveal About New Hindi Movie; said...

सरकारसत्ता ऑनलाईन  – गेल्याच महिन्यात ’36 गुण’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेला मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या सोशल मीडियावर
खूपच चर्चेत आहे. त्याने याआधी ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘पोलीस लाईन’, ‘एक तारा’ या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आला होता. त्याने त्याच्या अभिनयातून स्वतःची
एक छाप चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे. तर आता नुकतीच त्याने आपल्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे. ती सध्या सोशल मीडियावर
व्हायरल होत आहे (Santosh Juvekar).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संतोष जुवेकरने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी देत त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट शेअर केली. त्याने त्याचा आगामी चित्रपट कुत्ते याचे एक पोस्टर शेअर करत म्हणाला, “मित्रांनो 13 जानेवारीला एक अजून धमाका कुत्ते, खूप स्वप्न आहेत त्यातील एक अजून स्वप्न सत्यात उतरलं, यामध्ये त्यांनी चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली याबाबतचा खुलासाही केला आहे”.

 

तर या चित्रपटात संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सोबत अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज अश्या बड्या कलाकार मंडळींचा समावेश आहे. तर हा चित्रपट थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज यांनी केले आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर हा चित्रपट 13 जानेवारी 2023 दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले, तर गुलजार यांनी यातील गाणे लिहिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Santosh Juvekar | Santosh Juvekar’s Big Reveal About New Hindi Movie; said…

 

हे देखील वाचा :

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Pune Pimpri Crime | ‘पोलिसांना मी सरळ केले आहे…’, वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणारे दोनजण ताब्यात

Rashmi Thackeray | महाविकास आघाडीच्या मोर्चात रश्मी ठाकरेंचा सहभाग, शब्दही न बोलता आल्या चर्चेत

 

 

Related Posts