IMPIMP

Rashmi Thackeray | महाविकास आघाडीच्या मोर्चात रश्मी ठाकरेंचा सहभाग, शब्दही न बोलता आल्या चर्चेत

by nagesh
Rashmi Thackeray | rashmi thackeray in maha morcha join maha vikas aghadi mva march

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राजकारणात अनेक राजकीय पक्षात नेत्यांसोबत त्यांच्या पत्नींचा सहभाग पहायला मिळतो. त्यातच आता काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या राजकारणात सक्रिय दिसू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पक्षातील बंडाळीनंतर अलिकडे रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या महाविकास आघाडीने आयोजीत केलेल्या मोर्चात (MVA Mahamorcha) सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा जे जे रूग्णालयापासून (J J Hospital) सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) जवळ संपला. या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. यात ठाकरे कुटुंबातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) हे सहभागी झाले होते.

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनक्याच्या त्रासामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती. त्यादरम्यान देखील रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी महिला पदाधिकाऱ्यांसोबत पक्षाचा असणारा बंध जोपासला होता. पण बंडाळीनंतर शिवसेना पक्षात खिंडार पडले होते. तेव्हाच रश्मी ठाकरे या राजकारणात सक्रिय सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. बंडाळी झाल्यानंतर त्यांनी फुटलेल्या आमदारांच्या पत्नींना वैयक्तिक फोन करून, त्यांच्या पतींना मनवण्यासाठी देखील सांगितले होते. त्यानंतर रश्मी ठाकरे या पडद्यामागून शिवसेना चालवत असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होती.

 

तसेच नुकत्याच झालेल्या नवरात्रौत्सवात त्यांनी बंड केलेल्या मुख्यमंत्री शिंदेच्या (CM Eknath Shinde) बालेकिल्ल्यात म्हणजेच टेंभीनाका येथे जाऊन त्यांनी देवीची पूजा देखील केली होती. त्याचबरोबर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या आनंदाश्रमात जाऊन त्यांना श्रध्दांजली देखील वाहिली होती. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी शक्तिप्रदर्शन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज झालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चात रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसल्या.
त्यांच्यामागे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शेकडो महिला देखील होत्या.
इतक्या मोठ्या मोर्चात सहभागी होण्याची रश्मी ठाकरे यांची पहिलीच वेळ होती.
त्या मोर्चात सहभागी झाल्या मात्र त्यांनी कोणतंही भाषण केलं नाही किंवा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही.
काहीही न बोलता त्यांनी सर्वसामान्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांची मने जिंकली.

 

Web Title :- Rashmi Thackeray | rashmi thackeray in maha morcha join maha vikas aghadi mva march

 

हे देखील वाचा :

Police Committed Suicide | खळबळजनक! नैराश्यातून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Chandrakant Patil | शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, ‘फेसशिल्ड’ लावून केलं ‘पवनाथडी जत्रे’चं उद्घाटन

Aadhaar सोबत लिंक नसेल Voter ID तर मतदार यादीतून वगळले जाईल नाव?, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts