IMPIMP

Satara Crime | रक्षकच बनला भक्षक… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर ‘पॉक्सो’ अंतर्गत FIR

by nagesh
Satara Crime | a minor girl was molested by the police a case under pocso was registered in satara

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – Satara Crime | सातारा ते कोल्हापूर एसटी प्रवासादरम्यान एका पोलिसानेच अल्पवयीन युवतीचा (Minor Girl) विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने तक्रार केल्यानंतर संबंधित पोलिसाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन युवतीसोबत अश्लिल चाळे केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांत (Borgaon Police) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ (Satara Crime) उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीच्या (College Girl) शेजारी बसलेल्या महेश मारुती मगदूम (Mahesh Maruti Magdum) या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले.
दरम्यान, तरुणीने याबाबतची माहिती फोनवरुन आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली.
कराड एसटी स्टँडवर (Karad ST Stand) बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊन तिथे हजर झाले.
आणि छेड काढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात
(Karad City Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा बोरगाव हद्दीत घडल्यामुळे तपासासाठी बोरगाव पोलीस ठाण्यात (Borgaon Police Station) वर्ग
करण्यात आला आहे. (Satara Crime)

 

संबंधित पोलीस कर्मचारी हा कोल्हापूर पोलीस दलात (Kolhapur Police) कार्यरत आहे.
कोल्हापूर पोलीस खात्यात तो खेळाडू आहे.
सातारा शहरात सुरु असलेल्या 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा
(Kolhapur Regional Sports Competition) संपवून कोल्हापूरला जात असताना आरोपी मगदूम याने अल्पवयीन मुलीसोबत हे कृत्य केले.
दरम्यान, संशयीत आरोपी पोलीस मगदूम याला बोरगाव पोलिसांनी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
तसेच या कोल्हापूर पोलिसावर कलम 354 आणि पोक्सोच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Satara Crime | a minor girl was molested by the police a case under pocso was registered in satara

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांनी सरकारला फटकारले, शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार! सभेत सांगितला ‘ईडी’चा अर्थ

Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

MLA Sanjay Shirsat | आ.संजय शिरसाट यांना ‘हार्ट अटॅक’ची लक्षणं होती, मुलीने दिली माहिती

 

Related Posts