IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांनी सरकारला फटकारले, शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार! सभेत सांगितला ‘ईडी’चा अर्थ

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा
बंद (School Closed) करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन सुद्धा होत असून
विद्यार्थीसुद्धा या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. एकुणच गोरगरिब आणि दुर्गम भागात राहणार्‍या मुलांचे शिक्षण आणि भविष्य यामुळे संकटात
आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. अजित पवार Ajit
Pawar) बारामती येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शिक्षणाच्या मुळावर काहीजण उठले आहेत. अपुरी पटसंख्या असल्याचे कारण समोर करून शाळा बंद करण्याचा डाव ईडी सरकारने (ED Government) घातला आहे. ईडी म्हणजे, एकनाथराव (Eknath Shinde) आणि डी म्हणजे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. अजित पवारांनी ईडीचा असा अर्थ सांगताच उपस्थितांनी एकच घोषणाबाजी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जो गरिबातला गरिब आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही, जो दुर्गम भागात राहतो, जो आदिवासी भागात (Tribal Areas) आहे. जिथे शिक्षण अजून पोहोचले नाही अशा परिसरातील शाळा बंद कशाला करत आहात? ते पुढे म्हणाले, मी सुद्धा अर्थमंत्री होतो, शिस्तीचा आणि कडक आहे. आर्थिक शिस्त पाळणारा आहे, माझ्या जवळचा माणूस जरी चुकला तरी चुकले म्हणणारा आहे. पण अशा प्रकारचे काम कधी केले नाही.

 

पवार म्हणाले, विरोधीपक्ष म्हणून सभागृहामध्ये जो काही आवाज उठवायचा आहे. तो उठवणारच आहे.
पण हा जो काही घाट घातला आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाळा बंद होऊ नये, यासाठी आपण काम केले पाहिजे.
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तर शाळेत गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून विरोध झाला.
जर गृहपाठ नसेल तर विद्यार्थी करणार काय, मुले करणार काय, त्यांचे तर दिवाळे निघणार आहे.

 

एकतर पहिली ते सातवी परिक्षा घेणार नाही, असे धोरणच आणले होते. राज्यातील परिस्थिती अशी गंभीर करता येणार नाही.
सरकारला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावेच लागणार आहे, असे अजितप पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | state governments attempt to close schools ajit pawars allegation at baramti news

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

MLA Sanjay Shirsat | आ.संजय शिरसाट यांना ‘हार्ट अटॅक’ची लक्षणं होती, मुलीने दिली माहिती

Pune Crime | फरार गुन्हेगाराची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; खडकवासला येथील थरारक घटना

Andheri By-Election | …ही तर फिक्स मॅच, डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींची राज ठाकरे यांच्यावरही टीका

 

Related Posts