IMPIMP

Sharad Pawar | CM शिंदे – उदय सामंत यांनी केलेले आरोप हे शहाणपणाचे लक्षण नाही, शरद पवारांनी राज्य सरकारवर केली खोचक टीका

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

पुणेसरकारसत्ता ऑनलाइन – Sharad Pawar | राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभाराला दोन महिन्यांचा कालावधी
पूर्ण झाला, यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मला कारभार काही दिसला नाही. दोन
महिन्यांमध्ये आपल्याला सरकारचा कारभार दिसला नाही पण (सरकार) गतीमान झाले आहे. राज्यप्रमुख गतीमान असून राज्य समजून घेण्यासाठी
फिरत आहेत, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या गणपती आणि दहीहंडीच्या दौर्‍यांवर खोचक शैलीत टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिंदे सरकारच्या (CM Eknath Shinde) कारभाराविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिले. पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला लक्ष्य केले.

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांनीही मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात निर्णय घेतला नाही.
त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार जबाबदार आहे, असे हे मंत्री म्हणाले.
मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उदय सामंत (Uday Samant) आणि एकनाथ शिंदे मंत्री होते.
हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
मला वाटते हे शहाणपणाचे लक्षण नाही.

 

 

Web Title :- Sharad Pawar | NCP Chief sharad pawar comment on eknath shinde bjp government work in 2 months

 

हे देखील वाचा :

Narayan Rane On Sharad Pawar | गप्प बसा, राज्य सांभाळायला आम्ही…, शरद पवार यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर!

Pune Crime | सराईत गुन्हेगाराने केली हॉटेलची तोडफोड; किरकटवाडी फाटा येथील घटना

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

 

Related Posts