IMPIMP

Narayan Rane On Sharad Pawar | गप्प बसा, राज्य सांभाळायला आम्ही…, शरद पवार यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर!

by nagesh
Narayan Rane On Sharad Pawar | bjp leader and union minister narayan rane targets sharad pawar ncp uddhav thackeray shivsena vedanta foxconn

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Narayan Rane On Sharad Pawar | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकार आणि मोदी सरकारवर टीका केल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले, अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हते. म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता. आम्ही समर्थ आहोत. (Narayan Rane On Sharad Pawar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला आम्ही समर्थ आहोत. (Narayan Rane On Sharad Pawar)

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, विरोधकांना कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केले आहे? अडीच वर्ष मातोश्रीवरच राहून सरकार चालवले. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले आहेत.

 

 

काय म्हणाले होते शरद पवार…

पुण्यात आज पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, हा प्रकल्प तळेगावला येणार होता.
त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती.
पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही.
काही लोकांनी सांगितले की हा निर्णय बदलावा, प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा.
हे काही होणार नाही. असे व्हायला नको होते. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता.
पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पवार पुढे म्हणाले, आम्ही सत्तेत असताना मला मंत्रालयात रोज देशातल्या आणि देशाबाहेरच्या गुंतवणूकदारांशी बोलण्यासाठी वेळ काढायला लागायचा. दोन तास रोज द्यावे लागत होते. आज आपण ते वातावरण निर्माण करू. हे वाद थांबवुया.

 

 

Web Title :- Narayan Rane On Sharad Pawar | bjp leader and union minister narayan rane targets sharad pawar ncp uddhav thackeray shivsena vedanta foxconn

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत गुन्हेगाराने केली हॉटेलची तोडफोड; किरकटवाडी फाटा येथील घटना

Anil Bonde On Love Jihad | लव्ह जिहाद’वरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘मी संसदेत लवकरच…’

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली

 

Related Posts