IMPIMP

Sharad Pawar | शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…तर राज्यात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं, मात्र’

by nagesh
NCP chief Sharad Pawar | ncp sharad pawar slams modi government over maharashtra karnataka

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी २०१९ विधानसभा निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीबाबत गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री पदासाठी ज्यावेळी शिवसेना असून बसली त्यावेळी राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादीने आघाडी करून सरकार स्थापन करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यासंदर्भात माझ्याबरोबर चर्चाही झाली होती. मात्र मी त्याला नकार दिला असल्याचे पवार यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शरद पवार म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमधील मतभेद २०१९ च्या निवडणुकीनंतर वाढू लागले होते. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना असून बसली होती. त्यावेळी राष्ट्रवादीला बरोबर घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार मोदींच्या मनात आला असावा. त्या पार्श्वभूमीवर माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र पंतप्रधान कार्यालयात जाऊन मी त्यांना हे शक्य नाही असे सांगितले होते. त्यावर मोदींनी यावर आणखी विचार करा असा सल्ला दिला. पण मी आपल्या निर्णयावर ठाम राहिलो.

२०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेनेने (Shivsena) मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी केली. त्यावर भाजपने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. पण शिवसेनेने आपली भूमिका सोडली नाही. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्रित येऊन राज्यात सत्ता स्थापन करतील अशी चर्चा सुरु झाली. दरम्यानच्या काळात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. तर काही दिवसात राष्ट्रपती राजवट लागली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्याच दरम्यान, अचानक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि
अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
या घडामोडींमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या शपथविधीला शरद पवार (Sharad Pawar) यांचा पाठिंबा होता,
अशीची चर्चा सुरू होती. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले असून ते म्हणाले,
पहाटेच्या शपथविधीला अजित पवार (Ajit Pawar) यांना मीच पाठवले असल्याची चर्चा होत असते.
पण मी पाठवले असते तर सरकार स्थापन झालं असतं.
त्यामुळे पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता या चर्चेला काहीच अर्थ नाही.
असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

 

Web Title :- Sharad Pawar | then bjp ncp alliance government would have come state sharad pawars big secret pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Kalicharan Maharaj Arrested | महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत

Pune Crime | माजी गृह राज्यमंत्री आणि पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्यांचा ‘हिसका’ ! रिव्हॉल्व्हर पळविले

तीन दिवसानंतर जारी होईल PM Kisan योजनेचा 10वा हप्ता, जर नसेल यादीत नाव; ताबडतोब करा ‘हे’ काम

 

Related Posts