IMPIMP

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा ‘अध्यक्षाविनाच’; अध्यक्षपदासाठीच्या ‘स्पर्धेमुळे’ निवड लांबली

by nagesh
Pune Ganeshotsav 2022 | There is no plan to release water from the dam for Ganesh Visarjan this year - a statement from the Water Resources Department

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या निधनानंतर ट्रस्टचे अध्यक्षपद अद्यापही रिक्तच आहे. अध्यक्षपदाची घोषणा गणेशोत्सवानंतर १५ सप्टेंबरला होणार असल्याचे ट्रस्टींनी जाहीर केले आहे. त्यामुळे ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सव अध्यक्षाविनाच साजरा होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टवर संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहीलेले प्रतापराव उर्फ तात्या गोडसे यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव अशोक गोडसे हे अध्यक्ष झाले होते. परंतू काही महिन्यांपुर्वी अशोक गोडसे यांचे देखिल निधन झाले. अशोक गोडसे यांच्या निधनानंतर ट्रस्टींमधून अध्यक्ष निवडला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतू ट्रस्टच्या बैठकांमध्ये अध्यक्षपदावरून संघर्ष निर्माण झाल्याने अद्याप निर्णय होउ शकलेला नाही. ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजकिय व्यक्ती नको असा सूर काही मंडळींनी धरला तर काही मंडळींनी आपणच कसे योग्य दावेदार आहोत, अशी भूमिका घेतल्याने अध्यक्षपदाचा निर्णय होउ शकलेला नाही. (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust)

 

राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशभरामध्ये ख्याती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद सर्वदूर पोहोचला आहे. यावरून कार्यकर्ते आणि भक्तांमध्येही दबक्या आवाजात कुजबूज सुरू झाली आहे. दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपलेला गणेशोत्सव अध्यक्षांविनाच पार पडणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाल्याने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ट्रस्टींनी ट्रस्टचे अध्यक्ष दिवंगत अशोक गोडसे यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी तयार केलेल्या उत्सवाच्या आराखड्यानुसारच गणेशोत्सव साजरा होईल, असे जाहीर केले. मात्र, अध्यक्षपदाबाबत सर्व काही व्यवस्थीत सुरू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गोडसे यांनी ठरवलेला आराखडा नव्याने होणारा अध्यक्ष पूर्ण करणार नाही का, त्यासाठी अध्यक्षपद रिक्त का ठेवायचे, अध्यक्ष नसल्याने ट्रस्टतर्फे चालवण्यात येणार्‍या प्रकल्पांची कामे थांबल्यास त्याचे काय, त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्‍न विचारले जात आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशांतून या बाप्पाला देणग्या येतात.
या देणग्या, याचा कारभार, उपक्रम, त्या संबंधातील निर्णय या सगळ्या गोष्टींवर गेल्या सात महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
ट्रस्टच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या सुवर्णयुग सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जर बिनविरोध होत असेल,
तर ट्रस्टच्या अध्यक्षांचीही बिनविरोध आणि तातडीने नियुक्ती करून ट्रस्टचा लौकीक का जपला जात नाही,
असेही प्रश्‍न उपस्थित केले जाउ लागले आहेत.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची विश्‍वस्त मंडळ १४ सदस्यांचे आहे.
परंतू अनेक वर्षांपासून ११ सदस्यांचीच निवड केली जात असून ३ जागा रिक्तच ठेवण्यात येत आहेत.
मागील काही वर्षामध्ये ट्रस्टच्या तसेच मंडळाच्या कार्यात हिरिरीने भाग घेणारे अनेक कार्यकर्ते आहेत.
त्यांच्याकडूनही रिक्त तीन जागांवर इच्छा प्रदर्शित करण्यात येत आहे.
नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रस्टवर ११ सदस्य राहतील, असे जाहीर करण्यात आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
या पार्श्‍वभूमीवर आगामी गणेशोत्सवामध्ये विविध गटांकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust Ganeshotsav of Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust this year without a chairman The election was delayed due to the competition for the post of President

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Peoples Bank | सुरक्षित व पारदर्शी कारभारासाठी ‘सहकार’ वचनबद्ध ! दूरदृष्टीने पुणे पीपल्स बँकेचा विकास करण्याला सहकार पॅनलचे प्राधान्य

Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

 

Related Posts