IMPIMP

Pune Peoples Bank | सुरक्षित व पारदर्शी कारभारासाठी ‘सहकार’ वचनबद्ध ! दूरदृष्टीने पुणे पीपल्स बँकेचा विकास करण्याला सहकार पॅनलचे प्राधान्य

by nagesh
Pune Peoples Bank | Cooperation committed to safe and transparent governance Cooperation panels priority to develop Pune Peoples Bank with vision

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Peoples Bank | बँकेच्या भविष्यातील उज्वल व दैदिप्यमान वाटचालीसाठी, कुशल प्रशासन, पारदर्शी कारभार, संस्थेचा विकास, सभासद ठेवीदार, खातेदारांचे हित आणि सेवक वर्गाचे भविष्य नजरेसमोर ठेवून दूरदृष्टीने पुणे पीपल्स को-ऑप बँकेचा प्रामाणिकपणे विकास करण्यासाठी सहकार पॅनेल वचनबद्ध आहे. बँकेच्या आणि ग्राहकांच्या आर्थिक विकासासाठी सहकार पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी पत्रकार परिषदेत केले. (Pune Peoples Bank)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे पीपल्स को ऑप. बँकेची सन २०२२-२०२७ पंचवार्षिक निवडणूक रविवारी (दि. २८) होत आहे. यानिमित्ताने सहकार पॅनलच्या वतीने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी, सहकार पॅनेलचे उमेदवार आणि विद्यमान संचालक दिलीप उत्तमराव दगडे, संजय रमेशलाल गुगळे, अंबर किसनराव चिंचवडे यांच्यासह इतर उमेदवार दिलीप साहेबराव तनपुरे, महेंद्र ज्ञानोबा जगताप, मोरेश्वर सदाशिव देशपांडे, शिरीष जिजाबा मोहिते, आनंद रमेशलाल चोरडिया, मनोज पद्माकर नऱ्हेकर, राजू काशिनाथ साळुंके, संवेदीता मंदार बारसावडे, सुनील तुकाराम खोंड व स्वाती संपत ढमाले उपस्थित होते. (Pune Peoples Bank)

 

दिलीप दगडे म्हणाले, “बँकेचे मुख्यालय लवकरात लवकर पूर्ण करण्यासह पुणे आणि परिसरात बँकेचा विस्तार करण्यावर सहकार पॅनेलचा भर असणार आहे. लघु कर्जे, विविध उद्योगांना वाटप, खाते एनपीए होऊ न देणे, बँकेच्या डिजिटायझेशनवर भर देणे, आयएफएससी कोड मिळवणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना उपलब्ध करून देणे यासह महिला व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्याकरिता विशेष सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कागदपत्रांची पूर्तता होताच त्वरित कर्जमंजुरी, शाखानिहाय सभासदांतून सल्लागार समिती करण्याचा प्रयत्न आमचे संचालक मंडळ करेल.”

 

संजय गुगळे म्हणाले, “बँकेची वार्षिक व्यवसायवृद्धी ही महागाई दराच्या दुप्पट म्हणजे १८ टक्के, एकूण व्यवसाय पाच वर्षांत २५०० कोटीवरून ५७०० कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
आधुनिक तंत्रज्ञानासह व्यायसाय वृद्धीची जाण असलेल्या नवीन सेवकांची भरती, औद्योगिक क्षेत्रातील कामगार,
बचत गटांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा, सभासदांना अपघाती विम्याचे संरक्षण,
ठेवीदार व सेवक प्रतिनिधींना संचालक मंडळावर प्रतिनिधित्व, पारदर्शक कर्मचारी भरती, मोबाईल बँकिंग, युपीआय/क्यूआर कोड,
एसएमएस यासह इतर ऑनलाईन सुविधांवर भर दिला जाणार आहे.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंबर चिंचवडे म्हणाले, “सहकार पॅनलचे सर्व उमेदवार हे बँकिंग, आर्थिक, कामगार, व्यापार, उद्योग,
शिक्षण, महिला न्याय व कल्याण, सामाजिक क्षेत्रातील अनुभवी आणि तज्ज्ञ आहेत.
रविवार, दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
पुणे, मावळ, चिंचवड, दौंड, ठाणे आणि बेळगाव या सहा ठिकाणी मतदान केंद्र उभारलेली आहेत. पारदर्शक,
प्रामाणिक व सर्व सहमतीने कारभार करण्यास कटिबद्ध सहकार पॅनेलच्या पाठीशी आपण उभा राहावे.”

 

Web Title :- Pune Peoples Bank | Cooperation committed to safe and transparent governance Cooperation panels priority to develop Pune Peoples Bank with vision

 

हे देखील वाचा :

Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Pune Crime | लोणी काळभोर परिसरातील पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा, 10 जणांना अटक

Vitamin-C Deficiency | व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, अशी भरून काढा कमतरता!

 

Related Posts