IMPIMP

Side Effects Of Spinach | हिवाळ्यात जास्त पालक खाल्ल्याने होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान, डायबिटीजसह ‘या’ रुग्णांनी व्हावे सावध

by nagesh
Side Effects Of Spinach | side effects of spinach dont eating more in winter can cause major damage

सरकारसत्ता ऑनलाइन – Side Effects Of Spinach | हिवाळ्यात (Winter) अनेक लोक पालक आवर्जून खातात. पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात कारण त्यात पोषकतत्व जास्त असतात. पालक खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य तर सुधारतेच पण रक्तदाबही नियंत्रणात राहतो. (Side Effects Of Spinach)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याशिवाय पालक ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून हाडे मजबूत करण्यास मदत करते. मात्र, याचा अर्थ असा नाही की पालक जास्त प्रमाणात खावा. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पालक जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

 

तुम्ही पालकाची स्मूदी बनवून पिऊ शकता. पालक करी बनवू शकता. ऑम्लेटमध्ये टाकून किंवा डाळीत किंवा इतर कोणत्याही भाजीत मिसळून पालक खाऊ शकता. पण याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. पालक जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होऊ शकते आणि कोणत्या लोकांनी त्याचे सेवन टाळावे ते जाणून घेवूयात. (Side Effects Of Spinach)

पालकाच्या जास्त सेवनाने होतील या समस्या

 

1. होऊ शकते पोषक तत्वांची कमतरता (Nutrient deficiencies can occur)
पालकामध्ये पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात, परंतु त्यामध्ये असलेले ऑक्सॅलिक अ‍ॅसिड हा वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा घटक आहे. जेव्हा शरीरात या घटकाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा शरीरातील इतर खनिजे शोषून घेण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.

ऑक्सॅलिक अ‍ॅसिड जस्त, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमशी बांधले जाते, ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता होऊ शकते आणि आरोग्य बिघडू शकते.

 

2. शरीरात थकवा (Fatigue in the body)
पालक दिवसभरात जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात थकवा येतो. पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीची उर्जा कमी होते आणि दिवसभर सुस्ती राहते.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. पोटाच्या समस्या (Stomach problems)
पालकामध्ये भरपूर फायबर आढळते. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पालकामुळे पोटात गॅस, पोट फुगणे आणि पोट मुरडने यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शिवाय, त्याचा पचनावरही परिणाम होतो.

 

4. अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता (Possibility of allergies)
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिस्टामाइन असते. हिस्टामाइन हे शरीराच्या काही पेशींमध्ये आढळणारे रसायन आहे, ज्यामुळे काही बाबतीत अ‍ॅलर्जी होऊ शकते आणि शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

या लोकांसाठी पालकाचे सेवन धोकायदायक

 

* किडनी स्टोनची (Kidney Stones) समस्या असल्यास खाऊ नका पालक
ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी पालक खाऊ नये. जास्त पालक खाल्ल्याने शरीरात जास्त ऑक्सॅलिक अ‍ॅसिड तयार होते. अशा स्थितीत, शरीराला त्यास सिस्टमधून बाहेर काढणे कठीण होते.

त्यामुळे किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन जमा होऊ लागतो, जो किडनीमध्ये स्टोनची समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरतो.

 

* सांधेदुखीच्या (Joint pain) समस्या असल्यास खाऊ नये पालक
ऑक्सॅलिक अ‍ॅसिडसोबत पालकामध्ये प्युरीन देखील असते, जो एक प्रकारचा घटक आहे. हे दोन घटक एकत्रितपणे सांधेरोगास उत्तेजन देऊ शकतात. ज्यांना आधीच सांधेदुखी आणि सूज येण्याचा त्रास होत आहे त्यांच्यासाठी पालक जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

* मधुमेही (Diabetes) रुग्णांनी खाऊ नये पालक
पालकामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, जी रक्त पातळ करणार्‍या औषधावर प्रतिक्रिया देतात.
त्यामुळे जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, मधुमेही असाल किंवा किडनी स्टोनचा धोका असेल तर पालक खाणे टाळावे.

 

Web Title :- Side Effects Of Spinach | side effects of spinach dont eating more in winter can cause major damage

 

हे देखील वाचा :

ED | ईडीची मोठी कारवाई ! शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाला अटक

NCP Prashant Jagtap | पुण्यातील भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? NCP चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले…

Rice side effects | भात खाणे आवडते का, एकदा जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

 

Related Posts