IMPIMP

Sidharth Malhotra – Kiara Advani | अखेर सिद्धार्थ आणि कियारा ‘या’ तारखेला अडकणार लग्न बंधनात; राजस्थानमधील ‘या’ ठिकाणी घेणार सात फेरे

by nagesh
Sidharth Malhotra - Kiara Advani | sidharth malhotra kiara advani wedding to take place in rajasthan in february

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील फेमस जोडी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Sidharth Malhotra – Kiara Advani) यांच्या लग्नाची चाहत्यांना खूपच आतुरता होती. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात हे दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. मोजकेच नातेवाईक, मित्र परिवारामध्ये हे लग्न समारंभ पार पाडणार आहे. सध्या तरी दोघांपैकी कोणीही अधिकृत अशी माहिती दिलेली नाही. मात्र दोघांना नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घरी जाताना पाहण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले आहे. (Sidharth Malhotra – Kiara Advani)

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा यांचे लग्न 6 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. तर त्याआधी विविध विधी 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.तर राजस्थानमधील जसलमेर पॅलेस हॉटलमध्ये हे दोघे लग्न करणार आहेत. ‘लस्ट स्टोरीज’च्या व्रॅपअप पार्टीत पहिल्यांदाच दोघांची भेट झाली होती. त्यानंतर शेरशाह चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. यानंतर त्यांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधाण आले. अनेकदा त्या दोघांना एकत्रित स्पॉट देखील करण्यात आले. ते गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या अखेर आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

कियाराच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच ती ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसली होती.
त्यानंतर ती आता ‘सत्य प्रेम की कथा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या व्यतिरिक्त ती ‘RC 15’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
तर सिद्धार्थ मल्होत्रा ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ सोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
याशिवाय सिद्धार्थ ‘योद्धा’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Sidharth Malhotra – Kiara Advani | sidharth malhotra kiara advani wedding to take place in rajasthan in february

 

हे देखील वाचा :

Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर? दिल्लीचा संघ नव्या कर्णधाराचा करत आहे विचार; ‘हे’ आहेत दोन पर्याय

Pune Crime News | जेजुरी एमआयडीसीमधील बर्जर पेन्ट कंपनीमध्ये स्फोट, कामगाराचा मृत्यू

 

Related Posts