IMPIMP

SPPU Adhisabha Elections | पुणे विद्यापीठात भाजपचे वर्चस्व; महाविकास आघाडीला फक्त 1 जागा

by nagesh
SPPU News | Celebrating 'World Intellectual Property Day' at Savitribai Phule Pune University

सरकारसत्ता ऑनलाईन  –  SPPU Adhisabha Elections | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Savitribai Phule Pune University (SPPU) पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत भाजपच्या नऊ उमेदवारांनी बाजी मारत आपला विजय निश्चित केला. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फक्त एकच जागा मिळवता आली. या निवडणुकीत पहिल्यांदा राजकीय पक्षांनी उघडपणे पॅनल उभे केले होते. त्यामुळे निवडणुकीला राजकीय स्वरूप आले होते. त्यात भाजपशी (BJP) संबंधित विद्यापीठ विकास मंचने पुणे विद्यापीठाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. (SPPU Adhisabha Elections)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या निवडणुकीत भाजपसोबत संलग्न विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले पॅनल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनल, हिंदू महासभा आणि इतर पक्ष आणि संघटनांचे एकूण 37 उमेदवार 10 जागांसाठी रिंगणात होते. त्यातील 9 जागा विद्यापीठ विकास मंच (भाजप) ने जिंकल्या आहेत. आणि फक्त एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणता आला आहे. (SPPU Adhisabha Elections)

 

या निवडणुकीत खुल्या गटात प्रसेनजीत फडणवीस, सागर वैद्य, युवराज नरवडे, दादाभाऊ शिनलकर, अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे, भटक्या जाती प्रवर्गातून विजय सोनवणे, इतर मागास प्रवर्गातून सचिन गोरडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून गणपत नांगरे, तर महिला राखीव जागेवर बागेश्री मंठाळकर यांनी विजय मिळविला. महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या बाकेराव बस्ते या एकमेव उमेदवाराला या निवडणुकीत विजय मिळवता आला आहे.

 

 

Web Title :- SPPU Adhisabha Elections | bharatiya janata party BJP won in the savitribai phule university pune adhisabha elections

 

हे देखील वाचा :

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; पुण्यातील रुग्णालयात सुरु

Jalna ACB Trap | माजी सैनिकाकडून नोझल मशीनच्या स्टॅम्पिंगसाठी लाच मागणारा अधिकारी अटकेत, जालन्यातील घटना

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

 

Related Posts